संपर्क यादीबरोबर काम करणे (Working with a Contact List) - SR Education (ICT) Tech
स्पेल चेक (Spell Chake)
विंडोज लाईव्ह हॉटमेलमध्ये स्पेल चेक वैशिष्टय आहे. ज्यामुळे संदेशामधील स्पेलिंग्ज तपासता येतात आणि दुरुस्त करता येतात.
स्पेल चेक वैशिष्टय वापरण्यासाठी,
१. टुलबारवरील Spell Chake पर्यायावर क्लिक करा.
२. स्पेल चेक पृष्ठ येईल.
ज्या शब्दाचे स्पेलिंग चुकीची असेल तो पहिला शब्द लाल रंगात "Highlighted word not in dictionary" या टेक्स्टबॉक्समध्ये यईल.
३. Suggestion टेक्स्टबॉक्समध्ये सुचविलेली स्पेलिंग्ज येतील.
४. "Change Once" बटणावर क्लिक करा.
जर हा शब्द संदेशामध्ये अनेक वेळा आल असेल तर सर्व ठिकाणाचा शब्द बरोबर करण्यासाठी Change all बटणावर क्लिक करा.
लक्षात ठेवा की स्पेल चेक वैशिष्टये हे त्याच्या शब्दकोशामध्ये नसलेले शब्द चुकीचे शब्द म्हणून दाखवते. म्हणून, लोकांची, ठिकाणांची नावे, लघुरुपे, इ. चुकीचे स्पेलिंग म्हणून दर्शविले जातात.
५. मूळ स्पेलिंग तसेच ठेवण्यासाठी Ignore बटणावर क्लिक करा.
६. सर्व ठिकाणी आलेल्या शब्दात बदल करायचा नसल्यास Ignore all बटणावर क्लिक करा.
७. Add बटणावर क्लिक करुन तो शब्द शब्दकोशामध्ये (Dictionary) घाला.
जर तुम्ही तो शब्द डिक्शनरीमध्ये घातला तर पुढच्या वेळेस तो शब्द चुकीचा म्हणून दर्शविला जाणार नाही.
संदेश फॉरमॅट करणे
संदेश दिसण्यासाठी आणि वाचण्यासाठी अधिक उठावदार आणि आकर्षक करता येतो. संदेश अधिक उठावदार करण्यासाठी, फॉरमॅटिंग टूलबारचा उपयोग करतात. फॉरमॅटिंग टूलबारमुळे संदेशाची फॉन्ट स्टाईल, रंग, आकार, आणि बॅकग्राऊंड रंग निवडता येतो. फॉरमॅटिंग टुलबारमधील इमोटिकॉन्ससुद्धा (emoticons) (भावना दर्शविणारी चिन्हे) इमेल संदेशामध्ये घालता येतात.
टेक्स्ट एरियाच्या वर फॉरमॅटिंग टूलबार येतो.
खालील टेबलमध्ये फॉरमॅटिंग टूलबारवर असलेल्या विविध पर्यायांची यादी दर्शविली आहे. हे पर्याय वापरण्यासाठी, टेक्स्ट निवडा आणि बटणावर क्लिक करा.
संदेशमध्ये हायपरलिंक घालण्यासाठी,
१. संदेश एरियामधील टेक्स्ट निवडा.
२. Insert Link बटणावर क्लिक करा.
Insert Hiperlink बॉक्स दिसेल.
३. टेक्स्ट बॉक्समध्ये वेब ॲड्रेस टाईप करा.
४. Insert बटणावर क्लिक करा.
इमोटिकॉन्स (Emoticons)
इमोटिकॉन्स म्हणजे इमोशन आयकॉन्स (भावनांचे आयकॉन्स) किंवा इमोशन्ससह आयकॉन्स. ही छोटी चित्रे असून त्यांचा उपयोग विविध भाव आणि भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो.
इमोटिकॉन्स घालण्यासाठी,
१. इमोटिकॉन ज्या ठिकाणी घालायचा आहे तेथे कर्सर ठेवा.
२. Emoticons पर्यायावर क्लिक करा.
इमोटिकॉन्सची यादी दिसेल.
३. योग्य ते इमोटिकॉन निवडा.
संपर्क यादी (Contact List)
संपर्क यादी ॲड्रेस बुक सारखी असते. ही मेलबॉक्समध्ये साठविलेली इमेल पत्त्यांची यादी असते. याचा उपयोग मुख्यत: मोठा पत्ता लक्षात न ठेवता इमेल संदेश चटकन पाठविण्यासाठी होतो. व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक, वाढदिवस, घरचा पत्ता, टोपण नाव आणि यासारखा इतर तपशीलही संपर्क यादीमध्ये साठवता येतो.
नवीन संपर्क घालण्यासाठी,
संपर्क यादीत नवीन संपर्क घालण्यासाठी,
१. Contact टॅबवर क्लिक करा.
Contact पृष्ठ दिसेल.
२. New बटणावर क्लिक करा.
३. New Contacts पृष्ठ दिसेल.
४. संबंधित टेक्सट बॉक्सेसमध्ये तपशील घाला.
** तुमच्या आवडत्या संपर्क यादीमध्ये कॉन्टॅक्ट घालण्यासाठी, "Mark this contact as a favourite" हा पर्याय निवडा. जर हा पर्याय निवडला नाही. तर तो संपर्क (Contact) , Everyone Contact यादीमध्ये घातला जातो.
५. Save बटणावर क्लिक करा.
तुम्ही Edit पर्याय वापरुन कॉन्टेक्स्टमध्ये केव्हाही बदल करु शकता.
संपर्क यादी वापरणे (Using Contact List)
संपर्क यादीचा उपयोग इमेल ॲड्रेसस चटकन घालण्यासाठी होतो.
इमेल ॲड्रेसस घालण्यासाठी,
१. Mail टॅबवर क्लिक करा.
२. New बटणावर क्लिक करा.
३. Favourite Contact यादीमधून किंवा Everyone Contact यादीमधून योग्य त्या कॉन्टॅक्टवर क्लिक करा. To टेक्स्टबॉक्समध्ये ज्याच्याशी संपर्क साधायचा आहे त्याचा इमेल ॲड्रेस येईल.
४. Cc आणि Bcc टेक्स्टबॉक्समध्ये पत्ते घालण्यासाठी, संबंधित टेक्स्टबॉक्समध्ये क्लिक करा आणि Favourite Contacts मधील कॉन्टॅक्टला क्लिक करा.
ज्याच्याशी संपर्क साधायचा त्याचा इमेल ॲड्रेस Cc किंवा Bcc टेक्स्टबॉक्समध्ये येईल.