हॉटमेल संबंधी प्राथमिक - २ (Basic of Hotmail 2)
संदेशांना उत्तर देणे (Replying to Messages)
संदेशाला उत्तर देणे म्हणजे आधी असलेल्या संदेशाला उत्तर म्हणून पाठविणे. हे नवीन संदेश तयार करण्यासारखेच असते. फरक इतकाच कि तुम्हाला To या बॉक्समध्ये मेल ॲड्रेस टाकावा लागत नाही. जेव्हा असा रिप्लाय इमेल म्हणजेच उत्तर देण्याचा इमेल परत पाठविला जातो तेव्हा सब्जेक्ट लाईन Re: व पुढे मूळ विषयाचे टेक्स्ट याप्रमाणे विषयांची सुरुवात होते.
उत्तर पाठविण्यासाठी,
१. संदेश उघडा आणि Reply बटणावर क्लिक करा.
To बॉक्समध्ये प्राप्तकर्त्याचा इमेल ॲड्रेस आपोआप येईल.
२. Subject टेक्स्टबॉक्सखाली असलेल्या मोकळया जागेत संदेश टाईप करा.
३. Send बटणावर क्लिक करा.
संदेश पाठविला जाईल. Reply All बटणाचा उपयोग सर्व प्राप्तकर्त्यांना उत्तर पाठविण्यासाठी केला जातो. याद्वारे एकच संदेश सर्व प्राप्तकर्त्यांना पाठविला जातो.
संदेश पुढे पाठविणे (Forwarding a Messages)
संदेश पुढे पाठविणे म्हणजेच फॉरवर्ड करणे याचा अर्थ आधी असलेला संदेश विविध संदेश प्राप्तकर्त्यांना पाठविणे.
संदेश पुढे पाठविण्यासाठी,
१. संदेश उघडा आणि Forward बटणावर क्लिक करा.
२. बॉक्समध्ये ईमेल ॲड्रेस टाईप करा.
३. Subject टेक्स्टबॉक्सच्या खाली असलेल्या संदेश लिहिण्याच्या जागेत संदेश टाईप करा.
४. Send बटणावर क्लिक करा.
फोल्डर तयार करणे (Creating a Folder)
हॉटमेलमध्ये, Inbox, Junk, Drafts, Sent आणि Deleted यांसारखे फोल्डर्स बाय डिफॉल्ट असतात. या फोल्डर्सचा उपयोग विविध कारणांसाठी केला जातो. तुम्ही तुमच्या स्वत:चा फोल्डर तयार करु शकता.
नवीन फोल्डर तयार करण्यासाठी,
१. Deleted फोल्डरच्या खाली असलेल्या Manage Folders लिंकवर क्लिक करा. उपलब्ध असलेल्या फोल्डर्ससह नवीन विंडो दिसेल.
२. New पर्यायावर क्लिक करा. नवीन फोल्डरचे पृष्ठ दिसेल.
३. Folder Name टेक्स्टबॉक्समध्ये फोल्डरचे नाव टाईप करा.
४. Save बटणावर क्लिक करा.
नवीन तयार केलेला फोल्डर, इतर फोल्डर्ससह दिसेल.
फोल्डरमध्ये संदेश साठविण्यासाठी,
१. संदेशाच्या पुढे असलेल्या चेकबॉकसवर क्लिक करुन संदेश निवडा. एकाच वेळी अनेक संदेश निवडता येतील.
२. Move to लिस्ट बॉक्समधून ज्या फोल्डरमध्ये संदेश साठवायचे तो फोल्डर निवडा. निवडलेल्या फोल्डरमध्ये निवडलेले संदेश स्थलांतरित होतील.
संदेश काढून टाकणे (Deleting Messages)
संदेश काढून टाकण्यासाठी,
१. जो संदेश काढून टाकायचा तो निवडा.
२. Delete बटणावर क्लिक करा.
संदेश काढून टाकला जाईल आणि Deleted फोल्डरमध्ये तात्पुरता साठविला जाईल.
काढून टाकलेले संदेश पुन्हा मिळविणे
काढून टाकलेले संदेश जे Deleted फोल्डरमध्ये तात्पुरते साठविले जातात ते पुन्हा मिळविता येतात.
काढून टाकलेले संदेश पुन्हा मिळविण्यासाठी,
१. Deleted फोल्डर उघडा.
२. काढून टाकलेले संदेश निवडा.
३. Move to बटणावर क्लिक करा.
४. Inbox पर्याय निवडा.
संदेश कायमस्वरुपी काढून टाकण्यासाठी,
१. Deleted फोल्डर मिळवा.
२. संदेश निवडा.
३. Delete पर्यायावर क्लिक करा.
जर Delete फोल्डरमधून संदेश काढून टाकले तर ते पुन्हा कधीही मिळवता येत नाहीत.