माहितीची सुरक्षितता (Data Security)
उद्देश (Objectives)
हया तासाच्या शेवटी तुम्हाला हे माहिती पडेल.
1. पासवर्ड सेटिंगचे महत्व सांगणे.
2. फायरवॉल सेटिंगचे महत्व सांगणे
3. एनक्रिप्शनची गरज सांगणे
4. तुमच्या माहितीचा बॅकअप घेणे
अनधिकृत प्रवेशापासून तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी सुरूवातीपासूनच सावधगिरीच्या उपययोजना घेणे आवश्यक असते. असे अनेक मार्ग आहेत ज्यांद्वारे तुम्ही अनधिकृत प्रवेशापासून तुमची यंत्रणा आणि अन्य गोपनीय माहितीचे संरक्षण करू शकता. त्यापैकी काही सर्वसामान्य मार्ग आहेत.
1. पासवर्ड
2. फायरवॉल
3. एनक्रिप्शन
4. बॅकअप
पासवर्ड (Passwords)
तुमच्या माहितीचे रक्षण करण्यासाठी सर्वांत मार्ग म्हणजे पासवर्ड देणे. पासवर्ड हा तुम्ही तुमच्या फाईलला दिलेला एक गुप्त शब्द असतो. सॉफ्टवेअरची वैशिष्टये वापरून कुलुपबंद केलेल्या तुमच्या फाईलला तो किल्लेसारखे काम करतो. हा पासवर्ड वापरून अनधिकृत लोकांना तुमचा संगणक, फाईल्स आणि संकेतस्थळे पृष्ठे हाताळण्यास तुम्ही पायबंद घालू शकता. बहुतेक प्रकरणांत तुमच्या संगणकाला किंवा फाईलला पासवर्ड देणारे तुम्ही स्वत:च असणार.
उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या कोणत्याही गोपनीय फाईलला पासवर्ड देऊ शकता. ती फाईल उघडतेवेळी तुमचा संगणक तुम्हांला पासवर्ड टाका असे सांगेल. जेव्हा तुम्ही अचूक पासवर्ड टाकाल तेव्हाच संगणक ती फाईल उघडेल.
विंडोज XP मध्ये, तुम्ही टाईप केलेले प्रत्येक अक्षर लपविण्यासाठी पासवर्ड शब्द हे डॉट (.) मध्ये दिसतील. याद्वारे तुम्ही तुमचा पासवर्ड टाईप करत असतांना तो बघण्यापासून इतरांना प्रतिबंधित केले जाते.
तुमच्या यंत्रणेत दुसऱ्यांना लॉग इन करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठीही तुम्ही पासवर्डचा उपयोग करू शकता. कार्ययंत्रणेत प्रवेश करण्यासाठी तुम्हाला उपयोगकर्त्याचे नाव आणि पासवर्ड डायलॉग बॉक्समध्ये टाईप करावा लागतो. आकृतीत लॉगीन डायलॉग बॉक्स दाखवला आहे.
जर पासवर्ड खूप छोटा असेल किंवा तो तुमचे नाव असेल तर कदाचित कोणीतरी त्याचा मार्ग काढून तुमची फाईल हाताळू शकेल. तेथे कदाचित क्रॅकर्सही असू शकतील जे तुमचा पासवर्ड क्रॅक करण्यासाठी शब्दकोशाचा वापर करतील. चांगला पासवर्ड निवडण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे.
चांगला पासवर्ड निवडण्यासाठी मार्गदशग्क तत्वे (Guidelines to set a good password)
1. कोणीही अंदाज लावू शकतो अशी नावे वापरू नका.
2. शब्दकोशातील नावे वापरू नका.
3. पासवर्ड हा अक्षरे, संख्या आणि चिन्हे यांचे मिश्रण असावा.
4. पासवर्डमध्ये कमीतकमी आठ अक्षरे असली पाहिजेत.
5. वेगवेगळया गोष्टीसाठी एकसारखा पासवर्ड देऊ नका.
6. तुमचा पासवर्ड नियमितपणे बदलत रहा.
जर तुम्ही तुमचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहिलात तर अनधिकृत व्यक्ती तुमचा पासवर्ड वापरू शकणार नाहीत. जेव्हा तुम्ही वेगवेगळया गोष्टी उपयोगात आणत असाल, तेव्हा सगळयांसाठी एकसारखाच पासवर्ड वापरलेला नाही हयाची खात्री करून घ्या. नाहीतर, एखाद्याने तुमचा पासवर्ड शोधला तर त्यांना तुमच्या इतर सर्व गोष्टीसुध्दा सहज हाताळता येतील.
1. Technical masterminds. Technical Failure टेकनीकल त्रुटी
2. Computer Crimes (संगणकीय गुन्हे) !
3. Intellectual Property (बौध्दिक संपत्ती)
फायरवॉल (Firewall)
प्राचीन काळी, शत्रूंपासून राज्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याभोवती मोठे किल्ले बांधले जायचे. त्याचप्रमाणे, ह्या संगणकीय युगातही तुम्हाला नेटवर्कवरील तुमची गोपनीय माहिती अनधिकृत उपयोगकर्त्यांपासून संरक्षित करावी लागते. हे तूम्ही फायरवॉल साधने वापरून करू शकता.
फायरवॉल हे तुमच्या संगणकाभोवती उभारलेल्या विद्युत कुंपणासारखे काम करते. ते अनधिकृत व्यक्तिंना तुमची माहिती हाताळण्यापासून प्रतिबंध करते. फायरवॉल हे हार्डवेअर आणि काही कार्यक्रमांचा संच यांचा संयोग आहे जे नेटवर्क्सवर एक संरक्षक कृती म्हणून काम करते. आकृतीत फायरवॉल तुमच्या यंत्रणेचे अनधिकृत उपयोगकर्त्यांपासून कसे संरक्षण करते ते दाखविले आहे.
ते अधिकृत आणि अनधिकृत उपयोगकर्ता यांमधील फरक ओळखू शकते आणि अनधिकृत उपयोगकर्त्याला तुमची माहिती हाताळण्यापासून प्रतिबंध करू शकते. आजकाल, अनेक कंपन्यांकडे इंटरनेट कनेक्शनबरोबरच स्थानिक क्षेत्रीय नेटवर्क्स असते. त्यामुळे त्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपनीकडून त्यांच्या
नेटवर्कमध्ये प्रवेश मिळवून त्यांची गोपनीय माहिती क्रॅक करण्याची शक्यता असते. फायरवॉल अशा नेटवर्क्सचे रक्षण करण्यासाठी असते.
एनक्रिप्शन (Encryption)
इंटरनेटवरील माहिती ही मोठया प्रमाणात गैरवापर होणाऱ्यांपैकी एक आहे. उपरोल्लेखित सुरक्षायोजना असूनही लोक दुसऱ्यांचे संगणक क्रॅक करून त्यांची माहिती हाताळतात. पासवर्ड आणि फायरवॉल यांच्याखरीज एनक्रिप्शन नावाचे तंत्र वापरुनही तुम्ही तुमची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवू शकता.
एनक्रिप्शन ही माहिती चिन्हांकित प्रतिनिधित्वात रुपांतरीत करण्याची प्रक्रिया होय. हया प्रक्रियेमध्ये प्लेन टेक्सट असे संबोधली जाणारी मूळ माहिती एनक्रिप्ट स्वरूपात रुपांतरीत करण्यात येते. एनक्रिप्ट स्वरूपातील माहितीला सायफर टेक्स्ट असे म्हणतात. सायफर टेक्स्ट हे नंतर इंटरनेटवरुन प्रसारित केले जाते. स्वीकारणाऱ्या बाजूला सायफर टेक्स्ट हे पुन्हा मूळ स्वरूपात रुपांतरीत होते. त्यामुळे, जर कोणी तुमची माहिती हाताळण्यात यशस्वी झाला तरीही त्याला ती समजू शकणार नाही. खालील आकृती एनक्रिप्शनची प्रक्रिया दर्शविते.
कोणतेही एखादे एनक्रिप्शन सॉफ्टवेअर वापरून पाठविणारा हा मूळ प्लेन टेक्स्ट हे एनक्रिप्ट स्वरुपातील सायफर टेक्स्टमध्ये रुपांतरीत करतो. ही एनक्रिप्ट स्वरुपातील माहिती इंटरनेटवरुन स्थलांतरीत करण्यात येते. स्वीकारणाऱ्याच्या बाजूला सायफर टेक्स्ट हे पुन्हा मूळ स्वरुपात रुपांतरीत होते.
** सायफर टेक्स्टला परत प्लेन टेक्स्ट मध्ये रुपांतरीत करण्याच्या प्रक्रीयेला डिक्रिप्शन असे म्हणतात. **
एनक्रिप्शनचे अनेक सॉफ्टवेअर कार्यक्रम उपलब्ध आहेत. प्रिटी गुड प्रायव्हसी (PGP) हा सर्वात लोकप्रिय एनक्रिप्शन सॉफ्टवेअर कार्यक्रम होय.
बॅकउप (Backups)
अनधिकृत प्रवेशाखेरीज अजून इतर अनेक बाबी आहेत ज्यामुळे माहिती नष्ट होऊ शकते. त्यापैकी काही असे :-
1. वीज जाणे :- अचानकपणे वीज गेली असता यंत्रणा बंद होऊन संरक्षित न केलेली माहिती नष्ट होऊ शकते.
2. कार्यक्रम क्रॅश :- अचानक कार्यक्रम क्रॅश झाला असता संरक्षित न केलेली सगळी माहिती नष्ट होते.
3. अपरिचित उपयोगकर्ता :- नविन उपयोगकर्त्याला माहिती कशी संरक्षित करायची याचे ज्ञान नसल्यास त्यामुळे माहिती नष्ट होऊ शकते.
4. अशा प्रकारच्या समस्या उद्भवण्यापूर्वी तुम्हांला तुमच्या माहितीची प्रत घ्यावी लागेल. तुमच्या माहितीची अशाप्रकारे दुसऱ्या स्थानावर प्रत घेण्याच्या प्रक्रियेला बॅकअप घेणे असे म्हणतात.
तुमच्या हार्ड डिस्कवरील मूळ माहिती जर उपघाताने पुसली गेली किंवा तिच्यावर पुनर्लेखन झाले किंवा हार्ड डिस्क खराब झाल्याने तिला हाताळू शकत नाही तर नष्ट झालेली माहिती पुन्हा साठविण्यासाठी तुम्ही प्रतीचा वापर करू शकता.
विंडोज XP च्या कार्ययंत्रणेमध्ये बॅकअप नावाची यंत्रणा आहे जी तुमच्या माहितीचा बॅकअप घ्यायला मदत करते. बॅकअप किंवा रिस्टोअर विझार्ड उघडण्यासाठी पुढील पावले उचला :-
1. स्टार्ट बटणावर क्लिक करा.
2. ऑल प्रोग्रॅमवर क्लिक करा.
3. ॲक्सेसरीजवर क्लिक करा.
4. सिस्टम टूल्सवर क्लिक करा.
5. बॅकअपवर क्लिक करा.
जो डायलॉग बॉक्स दिसेल त्याला बॅकअप आणि रिस्टोअर डायलॉग बॉक्स असे म्हणतात. (आकृती ६ बघा) हा विझार्ड तुम्हांला यासाठी मदत करेल :
1. बॅकअप घेण्यासाठी.
2. फाईल्स पुनर्स्थापिक करण्यासाठी.
3. संगणकाची व्यवस्था पुर्नस्थापित करण्यासाठी.
तुमच्या फाईलचा बॅकअप घेण्यासाठी पावले. (Steps for taking a backup of your file)
1. बॅकअप युटिलिठी निवडल्यावर एक स्वागत विंडो उघडेल. नेक्स्ट बटनावर क्लिक करा.
2. बॅकअप फाईल्स आणि सेटिंग चेकबॉक्सची निवड करा आणि नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
3. सगळी माहिती चेक बॉक्स निवडा आणि नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
4. तुम्हाला जेथे बॅकअप हवा असेल ते स्थान निवडण्यासाठी ब्राऊज बटनावर क्लिक करा आणि नंतर नेक्स्ट बटणवर क्लिक करा.
5. प्रक्रिया संपविण्यासाठी फिनीश बटणावर क्लिक करा.
फाईल्सची प्रत निर्देशित स्थानावर स्थापिक केली जाईल. जर तुम्हांला कोणताही पर्याय बदलायचा असेल तर बॅक बटणवर क्लिक करा आणि योग्य पर्याय निवडा.
तुमची गोपनीय माहिती अनधिकृत व्यक्तीकडून हाताळली गेली नाही किंवा तिचा गैरवापर झालेला नाही याच्या खात्रीसाठी नेहमी सावधगिरी बाळगा.
** माहिती नष्ट होऊ नये यासाठी तुमची माहिती नेहमी संरक्षित ठेवा. **
आता तुम्हाला माहिती आहे. (Now you know)
** माहितीच्या सुरक्षिततेच्या सर्वसामान्य पध्दती :-
1. पासवर्ड
2. फायरवॉल
3. एनक्रिप्शन
4. बॅकअप
** पासवर्ड हा एक गुप्त शब्द असतो जो तुम्ही तुमच्या यंत्रणेला किंवा फाईलला देता.
** फायरवॉल हे हार्डवेअर आणि काही कार्यक्रमांचा संच यांचा संयोग आहे जे नेटवर्कवर एक संरक्षक कृती म्हणून काम करते.
** एनक्रिप्शन ही माहिती चिन्हांकित प्रतिनिधित्वात रुपांतरित करण्याची प्रक्रीया होय.
** प्रिटी गुड प्रायव्हसी (PGP) हा सर्वात लोकप्रिय एनक्रिप्शन सॉफ्टवेअर होय.
** तुमच्या माहितीची प्रत घेण्याच्या प्रक्रियेला बॅकअप घेणे असे म्हणतात.
हे आर्टिकल जर तुम्हाला आवडला असेल व अश्या टेक्नीकल क्नॉलेजसाठी आमच्या ब्लाग ला नक्की करा , जेनेकरून तुम्हाला पूढील माहीती व आमच्या ब्लॉग ची नोटीफीकेशन सर्वात आधी मिळेल.
धन्यवाद !