Technical masterminds. Technical Failure टेकनीकल त्रुटी

 

सॉफ्टवेअरशी संबंधीत समस्या (Software Related Problems)


        बाजारात अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. सॉफ्टवेअर वापरण्यामधील एक सर्वसाधारण समस्या म्हणजे विसंगती. बहुतेक सॉफ्टवेअर हे काही विशिष्ट कार्ययंत्रणेवरच आणि विशेष प्रकारच्या हार्डवेअरवरच चालतात. तुम्ही असे सॉफ्टवेअर कार्ययंत्रणेच्या जुन्या आवृत्तीवर किंवा वेगळी  हार्डवेअर वैशिष्ट्चे असलेल्या यंत्रणेवर चालवू शकत नाही.

        उदाहरणार्थ - समजा, कार रेस हे सॉफ्टवेअर चालण्यासाठी पेटियम प्रोसेसर असलेली विंडोज कार्ययंत्रणा आवश्यक असेल आणि जर तुमच्याकडे विंडोज 3.1 कार्ययंत्रणा चालविणारी 486 प्रोसेसरवर आधारित यंत्रणा असेल तर तुम्ही हे सॉफ्टवेअर चालवू शकत नाही. प्रत्येक सॉफ्टवेअरला यंत्रणेतील काही विशिष्ट गरजा आवश्यक असतात. ह्या गरजा सॉफ्टवेअर पॅकेजमध्ये सांगितलेल्या असतात. जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर खरेदी करता तेव्हा ते सॉफ्टवेअर तुमच्या यंत्रणेच्या आविन्यासास सुसंगत आहे हा हे तपासून घ्या.

** कोणतेही सॉफ्टवेअर खरेदी करण्याआगोदर ते सॉफ्टवेअर हे तुमच्या यंत्रणेच्या आविन्यासास सुसंगत आहे का हे तपासून बघा.


सॉफ्टवेअर बग्स (Software Bugs)

        कधीकधी काही कारणांमुळे सॉफ्टवेअर व्यवस्थित चालत नाही. ते कधी अचानकपणे अनपेक्षित अशी चूक करते आणि त्याच्याकडून अपेक्षित असलेली कृती करणे थांबविते. सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग अशा समस्या निर्माण करतो. बग म्हणजे सॉफ्टवेअर रचनेतील त्रुटी, जो कार्यक्रम चालू असतांना चूकी निर्माण करतो.

        2000 साल सुरू होण्याच्या मार्गावर असतांना संगणकीय जगतात माजलेली खळबळ तुम्हांला आठवते का? Y2K ह्या बगमुळे ती परिस्थिती उद्भवली होती. संगणकीय यंत्रणा क्रॅश किंवा हँग होण्याची भिती होती. सॉफ्टवेअर मधील हा Y2K भाग दूर करण्यासाठी लक्षावधी डॉलर खर्च केले गेले.

        जर हे बग्ज खूप गंभीर असतील आणि तुम्हांला वारंवार अडथळा आणत असतील तर तुम्ही सॉफ्टवेअर परत करून तुमचे पैसे परत मिळवू शकता. जर हे बग्ज किरकोळ असतील तर संकेतस्थळावर उपलब्ध पॅचेस किंवा दुरुस्तीचे कार्यक्रम वापरुन तुमचे सॉफ्टवेअर चूक विरहित बनवू शकता.

1. Computer Crimes (संगणकीय गुन्हे) ! 

2.  माहितीची सुरक्षितता (Data Security)

3. Intellectual Property (बौध्दिक संपत्ती)

हार्डवअरशी संबंधीत समस्या (Hardware Related Problems)

        हार्डवेअर हे मॉनीटर, कि-बोर्ड आणि हार्ड डिस्क यांसारख्या वास्तविक भागांना निर्देशित करते. संगणकाच्या वेगवेगळ्या भागांचे उत्पादन करणा-या मोठमोठ्या कंपन्या आहेत. उत्पादनाच्या वेळी ह्या कंपन्या खूप काळजी घेत असल्या तरी तुमच्या संगणकाचे हार्डवेअर समस्याग्रस्त होऊ शकते.

सर्वसामान्य समस्या आहेत :- 

1. हार्ड डिस्क फेल्युअर

2. डिव्हाईस कॉनफ्लिक्टस

3. वीज खंडीत होणे


हार्ड डिस्क फेल्युअर (Hard Disk Failure)

        सामान्यत: हार्ड डिस्कसंबंधीची सर्वसामान्य समस्या म्हणजे हार्ड डिस्क फेल्युअर. हार्ड डिस्क फेल्युअर हे खालील कारणांमुळे उद्भवू शकते.

1. वास्तविक शॉक

2. धूळ

3. सामान्य झिज

        बँड सेक्टरमुळेही तुमच्या संगणकाची हार्ड डिस्क बिघडू शकते. बँड सेक्टर म्हणजे डिस्कच्या पृष्ठभागावर पडणारे खराब डाग होय. हे बॅड सेक्टर तुमचे कार्यक्रम क्रॅश करू शकतात किंवा फाईल बिघडवू शकतात. ह्या बॅड सेक्टरमध्ये दुरूस्ती घडवून आणण्यासाठी काही सॉफ्टवेअर उपाययोजना उपलब्ध आहेत. तरीसुध्दा, जर तुमच्या हार्डडिस्कमध्ये एक मेगाबाईटपेक्षा जास्त बॅड सेक्‍ट असतील तर ते हार्डडिस्क संपूर्णपणे बिघडवू शकतात. अशा बाबतीत हार्ड डिस्क बदलणे हाच सर्वात चांगला मार्ग होय.


डिव्हाईस कॉनफ्लिक्टस (Device Conflicts)

        जेव्हा तीच यंत्रणा साधने दोन किंवा त्यापेक्षा जास्त उपकरणांमध्ये स्थापित केलेली असतात त्यावेळी डिव्हाईस कॉनफ्लिक्टसची समस्या उदभवू शकते. कधीकधी CD-RW ड्राईव्ह आणि जॉयस्टिक यांसारखे हार्डवेअरचे दोन भाग संगणकाच्या एकाच साधनांना पकडण्याचा प्रयत्न करतात. ह्या टक्करीच्या परिणामस्वरूप हार्डवेअरचे एक किंवा दोन्ही भाग निश्क्रिय बनतात.

        कॉनफ्लिक्टस तपासण्यासाठी तुम्ही विंडोज सिस्टिम इन्फॉरमेशन टूल वापरू शकता. तुमच्या सिस्टम मधील कॉनफ्लिक्टस विंडोज XP च्या साहाय्याने बघण्यासाठी स्टार्ट, ऑल प्रोग्रॅम्सवर क्लिक करा.

swapnilr88.blogspot.com


1. अक्सेसरीज, सिस्टिम टूल, सिस्टम इन्फॉरमेशन निवडा.

2. हार्डवेअर रिसोर्सेच्या पुढे असलेल्या अधिक चिन्हावर क्लिक करा आणि कॉनफ्लिक्टस / शेअरींगवर क्लिक करा.

तुम्हाला सगळया उपकरणांची यादी दिसेल जी एकाच संगणकीय साधनांचा वापर करतात.


वीजपुरवठा खंडीत होणे (Power Failure)

        तंत्रज्ञानाच्या उपयोगकर्त्यांना निराशाजनक अशी एक सामान्य समस्या म्हणजे वीजपुरवठा खंडित होणे. वीजपुरवठा खंडित होण्यामूळे पुढील शक्यता आहेत :-

1. हार्डवेअर फेल्युअर.

2. माहिती नष्ट होणे.

        वीजपुरवठा खंडित होण्यामूळे अचानक यंत्रणा बंद होते ज्यामूळे महत्वाची माहिती नष्ट होऊ शकते. संरक्षित न केलेली माहिती परत मिळविता येत नाही. काहीवेळा व्होल्टेजमधील चढउतारांमुळेही तुमची यंत्रणा खराब होऊ शकते.

        अशा प्रकारांमुळे नष्ट होणारी माहिती वाचविण्यासाठी तुम्ही युपीएस-अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय नावाचे उपकरण वापरणे गरजेचे ठरते. युपीएस वीजेचा प्रवाह नियंत्रित करतो आणि तुमचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थोडया वेळेसाठी तुमच्या यंत्रणेला वीज पुरवतो. त्यामुळे तुम्ही तुमचे सगळे काम संरक्षित करुन नंतर यंत्रणा योग्यरित्या बंद करू शकता.


डिफ्रॅगमेंटेशन (Defragmentation)

        तुमची यंत्रणा गती वाढविण्यासाठी डिफ्रॅगमेंटेशन हे उत्तम मार्गापैकी एक आहे. ह्या प्रक्रियेद्वारे तुमच्या हार्ड डिस्कमधील स्थानिक व्हॉल्युमचे विश्लेषण केले जाऊन / खंडित किंवा, तुटलेल्या फाईल्स जोडल्या जातात जेणेकरून त्या व्हॉल्यूममध्ये एकाच आणि अखंडित जागा प्राप्त करतील. व्हॉल्युम म्हणजे हार्ड डिस्क मधील साठविण्याची जागा. विंडोज XP मध्ये डिस्क डिफ्रेगमेंटर नावाची सिस्टम युटिलीटी असते जी यंत्रणेची हार्ड डिस्क डिफ्रेगमेंट करण्यासाठी वापरतात. डिस्क डिफ्रॅगमेटर युटिलीटी उघडण्यासाठी खालील क्रम अनुसरा :-

1. स्टार्ट बटणावर क्लिक करा.

2. ऑल प्रोग्रॅमवर क्लिक करा.

3. अक्सेसरीजवर क्लिक करा.

4. सिस्टिम टूलवर क्लिक करा.

5. डिस्क डिफ्रॅगमेंटरवर क्लिक करा.

swapnilr88.blogspot.com


ह्या विंडो मध्ये दोन भाग आहेत.

1. वरील भाग, ज्यात डिस्कमधील असलेल्या व्हॉल्युमचा समावेश असतो.

2. खालील भाग, जो डिफ्रेगमेंटेशन प्रक्रियेचे ग्राफिकल सादरीकरण दर्शवितो.‍

        व्हॉल्युम डिफ्रेगमेंट करण्याअगोदर तुम्हाला ठराविक व्हॉल्युममधील फ्रॅगमेंटेशनचे प्रमाण तपासावे लागेल. ठराविक व्हॉल्युम मधील फ्रॅगमेंटेशनचे प्रमाण तपासण्यासाठी, विंडोच्या वरील भागातील व्हॉल्यूम निवडा आणि 'ॲनलाईज' बटणावर क्लिक करा. आकृतीत डिस्क डिफ्रेगमेंटर डायलॉग बॉक्स दाखविला आहे जिथे फ्रॅगमेंटेशनचे प्रमाण पाहण्यासाठी C ड्राईव्ह निवडला आहे. व्हॉल्युमचे विश्लेषण केल्यानंतर डायलॉग बॉक्स तुम्हाला व्हॉल्युम मधील डिफ्रेगमेंट केलेल्या फाईल्स आणि फोल्डरची टक्केवारी दाखविते आणि पुढील कृती सूचीत करते. डायलॉग बॉक्स मधील व्हिव रिपोर्ट ह्या बटणावर  क्लिक करून तुम्ही विश्लेषणाचा विस्तृत अहवाल पाहू शकता. आकृतीत विश्लेषणाचा विस्तृत अहवाल दाखवित आहे.

        आता, व्हॉल्युम डिफ्रेगमेंट करण्यासाठी व्हिव रिपोर्ट डायलॉग बॉक्समधील डिफ्रेगमेंट ह्या बटणावर क्लिक करा. डिस्क डिफ्रेगमेंट प्रत्येक फाईल किंवा फोल्डरमधील भागांना व्हॉल्युम मधील एकाच स्थानावर पाठवितो, जेणेकरून प्रत्येकजण डिस्क ड्राईव्हमधील एकच आणि अखंडित जागा प्राप्त करील. परिणामस्वरूप, तुमची यंत्रणा तुमच्या फाईल्स आणि फोल्डर हाताळू शकेल आणि नविन अधिक कार्यक्षमपणे संरक्षित करू शकेल. पुढील आकृती डिफ्रेगमेंटेंशननंतरची डिफ्रेगमेंटर विंडो दाखवित आहे. तुम्ही संगणकसंबंधीत समस्या पूर्णपणे प्रतिबंधित करु शकत नाही. तरीसुध्दा, तुमच्या संगणकामध्ये उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांची माहिती तुम्हाला असली पाहिजे आणि ह्या समस्यांपासून बाधित होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सावधगिरीच्या उपाययोजना तुम्ही घेतल्या पाहिजेत.

swapnilr88.blogspot.com



आता तुम्हाला माहित आहे (Now You Know)

1. सॉफ्टवेअर हे असे उपयोजन आहे जे तुम्हाला विशिष्ट कृती करण्यास देते.

2. सॉफ्टवेअरमधील समस्या मुख्यता: विसंगतीमुळे निर्माण होतात.

3. बग म्हणजे सॉफ्टवेअर रचनेतील त्रुटी.

4. सॉफ्टवेअरमधील किरकोळ बग्ज पॅचेस किंवा दुरुस्तीचे कार्यक्रम वापरुन सोडवू शकता.

5. हार्डवेअर हे मॉनीटर, कि-बोर्ड आणि हार्ड डिस्क यांसारख्या संगणकाच्या वास्तविक भागांना निर्देशीत करते.

6. हार्ड डिस्कमधील सर्वसामान्य समस्या आहेत.

i) हार्ड डिस्क फेल्युअर

ii) डिव्हाईस कॉनफ्लिक्टस

iii) वीज खंडीत होणे

7. वीज खंडीत होण्यामूळे माहिती नष्ट होण्याचे टाळण्यासाठी तुम्ही युपीएस वापरु शकता. यूपीएस म्हणजे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय.

8. डिफ्रेगमेंटेशन प्रक्रियेद्वारे तुमच्या हार्ड डिस्कमधील स्थानिक व्हॉल्युमचे विश्लेषण केले जाऊन खंडित किंवा तुटलेल्या फाईल्स जोडल्या जातात जेणेकरून कामाची गती सुधारेल.

9. व्हॉल्युम म्हणजे हार्ड डिस्कमधील साठविण्याची जागा.

         हे आर्टिकल जर तुम्हाला आवडला असेल व अश्या टेक्नीकल क्नॉलेजसाठी आमच्या ब्लाग ला swapnilr88.blogspot.com नक्की करा , जेनेकरून तुम्हाला पूढील माहीती व आमच्या ब्लॉग ची नोटीफीकेशन सर्वात आधी मिळेल.

धन्यवाद !


Swapnil Raut

This blog is related to Education purpose and in this blog "Education and Health" related post are there.

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने