व्हायरस आणि ॲन्टीव्हायरस
(Virus and
Anti-Virus)
हया तासाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल :-
1. व्हायरसची व्याख्या
सांगणे.
2. व्हायरसचे प्रकार ओळखणे.
3. अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे
वर्णन करणे
तुम्हांला माहिती आहे की बॅक्टेरिया आणि व्हायरस हे सेंद्रिय पदर्थांपासून
बनलेल्या सजीव गोष्टीवर परिणाम करतात. पण व्हायरस हा संगणकाला कशाप्रकारे दुषित करतो ? संगणकाला दूषित करणारा
व्हायरस सामान्य नसतो.
व्हायरस (Virus)
संगणकाच्या क्षेत्रात व्हायरस हे नामाभिधान व्हायटल रिसोर्सेस अंडर सिंझ यासाठी
वापरतात. संगणकातील हा एक छोटा
कार्यक्रम आहे जो संगणकाची कार्यपद्धती बदलण्यासाठी लिहिलेला असतो. व्हायरसला नेहमी संगणकातील
विध्वंसक कार्यक्रम म्हटले जाते. ज्या लोकांना दुस-यांच्या संगणकातील माहितीला नुकसान पोहोचवायचे असते ते असे व्हायरस निर्माण
करतात. व्हायरस संगणकाला दूषित
करतो, स्वत:च्या अनेक प्रती तयार
करतो आणि नंतर संगणकाला नुकसान पोहोचविण्यास सुरूवात करतो.
काही व्हायरस हे कार्यक्रमांमध्ये बिघाड करून संगणकाला नुकसान पोहोचविणे किंवा हार्ड डिस्कची पुनर्रचना करणे यासाठी तयार केलेले असतात. इतर व्हायरस हे कोणतेही नुकसान करण्याच्या हेतूने तयार केलेले नसतात पण ते स्वत:च्या प्रतनिधित्व करतात आणि काही टेक्स्ट, व्हिडिओ किंवा ऑडिओ संदेशांच्या सादरीकरणाद्वारे स्वत:ची उपस्थिती दर्शवितात.
व्हायरसचा संगणकावरील परिणाम (Effects of virus on computers)
व्हायरस संगणक चालविण्यासाठी आवश्यक असणारा कार्यक्रम खोडू किंवा बदलू शकतो. हे व्हायरस संगणकामधील
माहितीचे नुकसान करू शकतात. ते संगणकामध्ये अजून दुसऱ्या जोडू शकतात. जेव्हा तम्ही व्हायरसने दूषित झालेल्या फाईल्स
संरक्षित करता, तेव्हा व्हायरससुद्धा
संरक्षित होतो, जर असा दूषित संगणक
इंटरनेटशी जोडला गेला तर व्हायरस संपूर्ण नेटवर्क्समध्ये पसरतो. सध्या व्हायरस बहुतांश
ई-मेलद्वारे पसरले जातात.
व्हायरसची सामान्य लक्षणे (Common Symptoms of Virus)
सध्याच्या संगणकीय युगात तुम्ही तुमच्या संगणकावर व्हायरसचे आंतरराष्ट्रीय
आक्रमण होण्यापासून टाळले पाहिजे. संगणक जेव्हा व्हायरसने दूषित झालेला असतो, तेव्हा तो वेगवेगळी लक्षणे दाखवतो.
1. पडद्यावर विचित्र संदेश
येतात.
2. यंत्रणेच्या प्रदर्शनात
उतार.
3. फाईलच्या साईझमधील विचित्र
वाढ.
4. संगणक पुन्हा पुन्हा
हँग होतात आणि आपोआप रिबूट होतात.
5. संगणकमधील कार्यक्रम
विचित्रपणे वागू लागतात.
6. फाईल्स अचानकपणे गायब
होतात.
7. तुमची हार्ड डिस्क हाताळण्यात
असमर्थता.
तुमच्या संगणकावर ह्या पैकी कोणतीही लक्षणे आढळली तर माहिती नष्ट होण्याचे
टोळण्यासाठी व्हायरस डिटेक्शन सॉफ्टवेअर चालू करा.
व्हायरस प्रकार (Types of Virus)
व्हायरसचे अनेक प्रकार आहेत जे तुमच्या संगणकावर परिणाम करू शकतात. त्यापैकी काही :-
1. बूट सेक्टर व्हायरस
2. मॅक्रो व्हायरस
3. फाईल व्हायरस
बूट सेक्टर व्हायरस (Boot Sector Virus)
बूट सेक्टर हा हार्ड डिस्कचा असा भाग आहे ज्यामध्ये डिस्कची फाईल सिस्टिम
आणि माहिती कार्ययंत्रणा भारीत करणारे शॉर्ट मशिन लॅगवेज कार्यक्रम यांची माहिती असते.
बूट सेक्टर व्हायरस डिस्कची सिस्टिमची जागा, म्हणजेच हार्ड डिस्क आणि फ्लॉपी डिस्कवरील
बूट रिकॉर्ड दुषित करतो. सगळया हार्ड डिस्क आणि फ्लॉपी डिस्क मध्ये बूट रेकॉर्ड एक छोटा कार्यक्रम
असतो जो संगणक सुरु झाल्यावर चालू होतो. बूट सेक्टर व्हायरस स्वत:ला डिस्कच्या ह्या भागाशी
जोडून घेतो आणि उपयोगकर्ता ज्यावेळी अशा दूषित डिस्कपासून सुरू करण्याचा प्रयत्न करतो
त्यावेळी स्वत:ला कार्यन्वित करतो. बूट सेक्टर व्हायरसची
उदाहरणे आहेत :- फॉर्म, डिस्क किलर, कायकलएंजेलो आणि स्टोन्ङ
2. माहितीची सुरक्षितता (Data Security)
3. Intellectual Property (बौध्दिक संपत्ती)
मॅक्रो व्हायरस (Macro Virus)
मॅक्रो व्हायरस हे माहितीच्या फाईल्स दूषित करतात. स्वत:ला विभाजित करण्यासाठी
ते उपकरणाच्याच मॅक्रो कार्यक्रम भाषेचा उपयोग करतात. हे व्हायरस एम एस वर्ड (MS-Word) फाईल्स तसेच कार्यक्रम
भाषा वापरणाऱ्या अन्य उपकरणालाही दूषित करतात.
मॅक्रो व्हायरस तुमच्या यंत्रणेमधील डॉक्युमेंट आणि टेंपलेट दुषित करू शकतात. मँक्रो व्हायरस असलेले
डॉक्युमेंट किंवा टेंम्पलेट उघडल्यास तुमची यंत्रणा दूषित होईल आणि तो तुमच्या यंत्रणेत
असलेल्या अन्य डॉक्यूमेंट आणि टेंम्पलेटमध्येही पसरेल. मॅक्रो व्हायरसची काही
उदाहरणे आहेत :- ऑटो ओपन, पे लोड, w97m, wm, मेलिसा, नाईस डे आणि w97m.ग्रुव्ह.
फाईल व्हायरस (File Virus)
फाईल व्हायरस हे तुमच्या संगणकामधील कार्यक्रम फाईल्स दुषित करतात. हे व्हायरस सर्वसामान्यपणे एक्झीक्युटेबल कोडला दूषित करतात. जेव्हा एक दुषित कार्यक्रम फ्लॉपी, हार्ड डिस्क किंवा नेटवर्कवरून चालू केला जातो तेव्हा फाईल व्हायरस अन्य फाईल्सना दुषित करतात. ह्यापैकी बरेच व्हायरस हे संगणकाच्या स्मृतीमध्ये वास्तव्य करतात. स्मृती दूषित झाल्यावर स्मृतीमधून चालणा-या अन्य दूषित नसलेल्या फाईल्ससुद्धा दूषित होतात. फाईल्स व्हायरसची उदाहरणे आहेत :- जेरूसलेम आणि कॅसकेड.
अँटीव्हायरस (Anti-Virus)
अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरून तुम्ही तुमचा संगणक व्हायरसपासून सुरक्षित ठेवू
शकता. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हा एक कार्यक्रम आहे जो व्हायरस शोधण्यासाठी
तुमच्या संगणकाची हार्ड डिस्क स्कॅन करतो. जर कोणताही व्हायरस सापडला तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर
तुमच्या संगणकामधून व्हायरस काढून टाकतो. सध्या बाजारात कित्येक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर
उपलब्ध आहेत. त्यापैकी काही आहेत :-
1. नॉर्टन अँटीव्हायरस
2. VX 2000
3. स्मार्ट डॉग
नवीन नवीन व्हायरस हे दर दिवशी तयार होत असतात त्यामुळे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर त्यांना ओळखू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला अँटीव्हायरस सॉफ्टवेअर
नियमितपणे अद्ययावत करावे लागते. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हे मुख्यता चार प्रकारात विभाजीत करात येते.
1. काही ठराविक सह्या तपासणारे
सॉफ्टवेअर
2. काही ठराविक कोड तपासणारे
सॉफ्टवेअर
3. माहितीची एकात्मता तपासणारे
सॉफ्टवेअर
4. सक्रीय व्हायरसचे कार्य
अडविणारे सॉफ्टवेअर
काही ठराविक सह्या तपासणारे सॉफ्टवेअर ( Software that checks for specific signature )
काही व्हायरसना बाईटच्या स्ट्रिंग असतात ज्यांना सिगनेचर (सही) म्हणतात, जे ज्याच्याशी संबंधीत
अशा प्रकारचे नमुने असतात. अँटीव्हायरस कार्यक्रमांना ज्ञात अशा व्हायरसचा डेटाबेस असतो. ते डेटाबेसमध्ये अशा
सह्यांचा शोध घेतात आणि ठराविक व्हायरसची उपस्थिती ओळखतात. अशाप्रकारचे अँटीव्हायरस
फक्त डेटाबेसमध्ये उपलब्ध व्हायरसांचाच शोध घेऊ शकतात.
काही ठराविक कोड तपासणारे सॉफ्टवेअर (Software that checks specific code)
व्हायरस हे कोडच्या स्वरूपातही कार्यक्रमांमध्ये असू शकतात. काही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर जे व्हायरस हे कोडच्या स्वरुपातही कार्यक्रमांमध्ये असू शकतात. हे व्हायरस जेव्हा दूषित फाईल्स आपल्या स्वभावधर्मापेक्षा वेगळे कार्य करतात तेव्हा हे व्हायरस ओळखले जातात. हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नवीन व्हायरसना ओळखण्यास मदत करतात.
माहितीची एकात्मता तपासणारे सॉफ्टवेअर (Software that checks the integrity of Data)
काही अँटीव्हायरस कार्यक्रम हे वेळेनुसार कार्यक्रमांची विश्वासार्हता तपासतात. हे अँटीव्हायरस कार्यक्रम
नियमीत कलांतरात फाईल्स किंवा कार्यक्रमांवर काही परिचलन करता. परिचलन केलेल्या माहितीतील
काही फरक व्हायरसची उपस्थिती दाखवितो.
सक्रीय व्हायरसचे कार्य अडविणारे सॉफ्टवेअर (Software that Intercepts a Virus in Action)
काही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कार्यक्रम आहेत जे व्हायरस सक्रिय असतांना त्यांना
शोधून काढतात आणि त्यांचे कार्य थांबवितात. हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कार्यक्रम सतत व्हायरस तपासत
असतात आणि व्हायरसच्या उपस्थितीत बदल घडवितात.
व्हायरसला प्रतिबंध (Preventing Viruses)
व्हायरसचा फैलाव आणि हल्ला यांना प्रतिबंध करणा-या अँटीव्हायरस सॉफ्टवेअर
कार्यक्रमांचे महत्व तुम्ही जाणले पाहिजे. सापधगिरीच्या योग्य उपाययोजना घेतल्यास तुम्ही तुमचा
संगणक व्हायरसपासून मुक्त ठेवू शकता. व्हायरसपासून तुमचा संगणक मुक्त ठेवण्यासाठी काही उपाययोजना
इथे दिल्या आहेत. :-
1. सगळया फ्लॉपी डिस्क
त्यांच्यावर फाईल्स कॉपी करण्यापूर्वी किंवा उघडण्यापूर्वी स्कॅन करा.
2. संगणकावर किमान एकतरी
अँटीव्हायरस कार्यक्रम ठेवा आणि त्याच्या मदतीने संगणकावरील व्हायरस नियमितपणे तपासा.
3. संगणकाला नवीन व्हायरसपासून
सुरक्षित ठेवण्यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कार्यक्रम नियमितपणे अद्ययावत करा.
4. व्हायरसचा हल्ला झाल्यास
नुकसान कमी करण्यासाठी फाईल्ससा नियमितपणे बॅकअप द्या.
1. व्हायरस म्हणजे व्हायटल इनफॉर्मेशन अंडर सिझ.
2. व्हायरस हे लहान कार्यक्रम असतात जे प्रतिबंधित होऊ शकतात आणि फाईल्सला जोडून घेऊन त्यांना दूषित करु शकतात.
3. व्हायरसला नेहमी संगणकातील विध्वंसक कार्यक्रम म्हटले जाते.
4. व्हायरसचे अनेक प्रकार आहेत जे तूमच्या संगणकावर परिणाम करू शकतात. त्यापैकी काही :-
I) बूट सेक्टर व्हायरस
II) मॅक्रो व्हायरस
III) फाईल व्हायरस
5. ॲटीव्हायरस सॉफ्टवेअर हा एक कार्यक्रम आहे जो व्हायरस शोधण्यासाठी तुमच्या संगणकाची हार्ड डिस्क स्कॅन करतो.
6. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हे मुख्यात्वे चार प्रकारात विभाजित करता येते.
अ. काही ठराविक सह्या तपासणारे सॉफ्टवेअर
ब. काही ठराविक कोड तपासणारे सॉफ्टवेअर
क. माहितीची एकात्मता तपासणारे सॉफ्टवेअर
ड. सक्रीय व्हायरसचे कार्य अडविणारे सॉफ्टवेअर
7. नवीन व्हायरस शोधण्यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नियमीतपणे अद्यावत करा.
8. फ्लॉपी डिस्क किंवा हार्ड डिस्क हाताळण्यापूर्वी स्कॅन करा.
नक्की करा , जेनेकरून तुम्हाला पूढील माहीती व आमच्या ब्लॉग ची नोटीफीकेशन सर्वात आधी मिळेल.
धन्यवाद !