14 hottest Computer Crimes (संगणकीय गुन्हे) ! trends for 2023

‍डिजीटल गुन्हे (Digital Crimes)
14 hottest Computer Crimes (संगणकीय गुन्हे) !  trends for 2023

    पुर्वीच्या काळी लोक स्वत:ची मुल्यवान संपत्ती चोरांपासून वाचविण्यासाठी आपल्या घरांना केवळ साधी कुलुपे वापरायचे. सध्या, गुन्हांना आळा घालण्यासाठी व्यक्ती आणि संस्था अलार्म आणि इन्फ्रारेड डिटेक्टर्स यासांरखी अद्यावत उपकरणे वापरतात. चोरीसारख्या प्रत्यक्ष गुन्हांप्रमाणेच संगणकाच्या क्षेत्रातही गुन्हे घडत असतात. अशा गुन्हांना डिजिटल गुन्हे म्हणतात. आजकाल सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या संगणकीय गुन्हयांमध्ये पुढील गुन्हांचा समावेश होतो :-

* माहिती चोरणे 
* व्यक्तिगत माहितीचा गैरवापर
* क्रेडीट कार्ड क्रमांकांचा गैरवापर
* दुस-याच्या माहितीमध्ये फेरफार
* अधिकृत संकेतस्थळे क्रॅक करणे

    संगणकामुळे माणसाचे जीवन अतिशय सोपे आणि आरामशीर झाले आहे. आजकाल विमानवाहतूक, रेल्वेच्या तिकीटांचे आरक्षण, दूरध्वनी, बँक, संशोधन केंद्रे, यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर केला जातो. यामुळे आपल्यांला वाढत्या प्रमाणात संगणकावर अवलंबून राहावे लागत आहे. एखादी लहानशी चूकसुध्दा विमान अपघातासारखी खूप मोठी समस्या निर्माण करू शकतो.


माहितीचा गैरवापर (Data Misuse)

    डिजीटल गुन्हे हे सर्वसाधारणपणे मोठ्या नेटवर्कमुळे होत असतात. संगणक हे सार्वजनिक नेटवर्क्सव्दारे एकमेकांना जोडलेले असतात, जे पुन्हा इतर नेटवर्क्सना जोडले जातात. जेव्हा मोठया नेटवर्क मधून माहिती स्थलांतरित होत असते, तेव्हा ती माहिती इतरांकडून काढून घेण्याची किंवा त्यात फेरफार केली जाण्याची शक्यता असते.

माहिती चोरणे (Stealing Data)

    एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये माहिती स्थलांतरीत होत असतांना त्या माहितीमध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे. स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. स्थलांतरीत होणारी माहिती इतरांकडून बघितली जाण्याची, काढून टाकण्याची, किंवा त्यात फेरफार केला जाण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या डिजिटल गुन्हयांमुळे माहितीसाठी मुख्यत्वे संगणकावर अवलंबून असणा-या संस्थांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. आपले काम पूर्वपदावर आणण्यासाठी अशा संस्थांना कित्येक महिेनेसुध्दा लागू शकतात.  


  व्यक्तीगत माहितीचा गैरवापर (Misusing Personal Details)

    एखाद्या संस्थेची माहिती चोरून त्यात बदल करण्याबरोबरच गुन्हेगार दुसऱ्याच्या व्यक्तिगत माहितीचाही गैरवापर करतात. अशा घुसखोरांसाठी इंटरनेट हे अशी अनधिकृत माहिती पाहण्यासाठीचे एक प्रवेशद्वार ठरते. असे कित्येक प्रकारचे इंटरनेट तंत्रज्ञान उपलब्ध आहे कि ज्याचा वापर करून तुम्ही दुसऱ्याची व्यक्तिगत माहिती पाहू शकतात. यापैकी बहुतांशी वापरले जाणारे म्हणजे मेसेज बोर्ड आणि चॅट रुम. हे दोन्ही रोज लाखो लोकांकडून हाताळले जातात. लोक अनेकवेळा इतरांशी संवाद साधतांना स्वत:ची व्यक्तिगत माहिती उघड करतात. ही माहिती नेटवर्क्स वर सगळ्यांसाठी उघड होते. वाईट हेतू बाळगणारे लोक ही माहिती चूकीच्या मार्गाने वापरतात.


क्रेडिट कार्ड क्रमांकांचा गैरवापर (Misusing Credit Card Numbers)

    सद्या क्रेडिट कार्डची लोकप्रियता वाढत आहे. क्रेडीट कार्ड हे बँकेकडून दिले जाते, ज्याचा वापर करून तुम्ही रोख पैसे दिल्याशिवाय सामान खरेदी करू शकता. तुमच्या खात्यातून नंतर ती रक्कम कापून तुम्ही रोख पैसे दिल्याशिवाय सामान खरेदी करू शकता. आकृतीत क्रेडीट कार्डचा नमुना दाखविण्यात आल आहे. क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही इंटरनेटवरुनही सामान खरेदी करू शकता. तुम्ही ज्या संकेतस्थळावर मागणी नोंदवली आहे त्या संकेतस्थळावर बँकेचे नाव, तुमच्या क्रेडिट कार्डचा क्रमांक आणि आवश्यक माहिती द्यावी लागते. तुमच्या खात्यातून नंतर ती रक्कम कापून घेतली जाते. जर ते संकेतस्थळ विश्र्वस्त नसेल तर तेथे तुमच्या क्रेडिट कार्ड क्रमांकाचा दुरूपयोग होण्याची शक्यता असते. वाईट हेतू बाळगणारे लोक तुमच्या  क्रेडीट कार्ड क्रमांकाचा दुरूपयोग करून स्वत:साठी वस्तू खरेदी करू शकतात. त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूची किंमत तुमच्या खात्यातून कापून घेतली किंवा वजा केली जाईल. त्यामुळे विश्र्वस्त नसलेल्या संकेतस्थळेवर तूमच्या क्रेडिट कार्डची माहिती देणे हे खूप धोकादायक आहे.

swapnilr88.blogspot.com
क्रेडिट कार्ड



हॅकर्स आणि क्रॅकर्स (Hackers and Crackers)

    दुसऱ्याच्या नकळत त्यांच्या संगणकाचा दुरुपयोग करणाऱ्यांना हॅकर्स किंवा क्रॅकर्स असे म्हणतात. 

हॅकर्स (Hackers)

    हॅकर्स हे बुध्दीमान प्रोग्रॅमर असतात ज्यांना संगणकाची आणि प्रोग्रॅमिंगच्या भाषांची सखोल माहिती असते. स्वत:च्या क्षमता वाढविण्यासाठी प्रोग्रॅमेबल रचनांचा शोध घेणे त्यांना आवडते.
प्रोग्रॅमींग भाषांमधील एखाद्या समस्येसाठी हॅक हे खरोखर एक चांगले समाधान आहे. सहज गंमत म्हणून किंवा आव्हान म्हणून हॅर्कस दुसऱ्यांची यंत्रणा ब्रेक करतात. स्वत:चे कौशल्य आणि ज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी किंवा ते सिध्द करण्यासाठी ते असे करतात. ते स्वत:च्या कौशल्याचा उपयोग विनाशकारी उद्देशांसाठी वापरत नाहीत. सर्वसाधारणपणे ते दुसऱ्यांच्या सिस्टिमची सुरक्षा तपासत असतात आणि त्यातील उणिवा शोधून काढतात.

क्रॅकर्स (Crackers)

    दुसऱ्यांची माहिती नष्ट करणे किंवा त्यात बदल करणे अशा हानीकारक कामांसाठी दुसऱ्यांचे मशिन हॅक करणाऱ्यांना क्रॅकर्स म्हणतात. क्रॅकर्स एक आव्हान म्हणून किंवा दुष्ट हेतूने नेटवर्क्सद्वारे दुसऱ्यांच्या संगणकामध्ये शिरकाव करतात. क्रॅकर्स गंमत म्हणून संगणक हॅक करायला सुरूवात करतात आणि नंतर स्वत:च्या कौशल्याचा वापर शासकीय संकेतस्थळे आणि अन्य अधिकृत संकेतस्थळे हॅक करण्यासाठी करतात.
    हॅकर हा क्रॅकर असण्याची आवश्यकता नाही. पण क्रॅकर्स हा मात्र उत्तम हॅकर असावा लागतो. पण सामान्यत: लोक ह्यांतील फरक ओळखण्यात अपयशी ठरत असल्याने हॅक आणि क्रॅक हे दोन्ही शब्द वारंवार अदलाबदलीने वापरले जातात.


swapnilr88.blogspot.com
क्रॅकर्स


 आता तुम्ही जाणता (Now You Know)

1. आजकाल सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या संगणकीय गुन्हयांमध्ये समावेश होणारे गुन्हे  :- 
I) माहिती चोरणे
I‍I) व्यक्तिगत माहितीचा गैरवापर
III) क्रेडीट कार्ड क्रमांकांचा गैरवापर
2. डिजिटल गुन्हे हे सर्वसाधारण मोठया नेटवर्क्सच्या ठिकाणी होतात.
3. हॅकर्स हे बुध्दीमान प्रोग्रॅमर असतात ज्यांना संगणकीय प्रणालीची सखोल माहिती असते.
4. हानीकारक कामांसाठी दुसऱ्यांचे मशिन हॅक करणाऱ्यांना क्रॅकर्स असे म्हणतात.                     

        हे आर्टिकल जर तुम्हाला आवडला असेल व अश्या टेक्नीकल क्नॉलेजसाठी आमच्या ब्लाग ला swapnilr88.blogspot.com नक्की करा , जेनेकरून तुम्हाला पूढील माहीती व आमच्या ब्लॉग ची नोटीफीकेशन सर्वात आधी मिळेल. 
धन्यवाद !

Swapnil Raut

This blog is related to Education purpose and in this blog "Education and Health" related post are there.

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने