Intellectual Property (बौध्दिक संपत्ती)

बौध्दिक संपत्ती (Intellectual Property)

उद्देश (Objectives)

या सत्राच्या शेवटी तुम्ही या गोष्टी करु शकाल :- 

1‍. बौध्दिक संपत्ती स्पष्ट करणे. 

2. कॉपीराईटचे महत्व स्पट करणे.

3. सॉफ्टवेअर चोर्य (software privacy) स्पष्ट करणे.

        माहिती तंत्रज्ञानाने प्रभावित असलेल्या जगात सध्या लोक राहात आहेत. औद्योगिक युगात, लोक उत्पादन, विणनन, इ. कामे करत असत, ज्यामध्ये मुख्यत्वे शारीरिक कामांचा समावेश असे. व्यक्तिंचा कल्पना किंवा कल्पक लिखाणाला कमी महत्व दिले जात असे. सध्याच्या काळात बौधिक संपत्तीकडे अधिकाधिक लक्ष देण्यात येत आहे. संपत्तीचे वर्गीकरण खालील प्रकारांमध्ये केले जाते.

1. प्रत्यक्ष संपत्ती (Physical Property)

2. बौध्दिक संपत्ती  (Intellectual Property)


बौध्दिक संपत्ती  (Intellectual Property)

        ज्या वस्तू दिसतात, अनुभवता येतात आणि ज्यांना स्पर्श करता येतो त्यांना प्रत्यक्ष संपत्ती असे संबोधले जाते. उदा. पुस्तक हे प्रत्यक्ष संपत्ती आहे कारण ते हातात धरता येते आणि एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेता येते. परंतु पुस्तकामधील तपशील किंवा लेखन हे त्या लेखकाची सर्जनशीलता असते. त्यास बौध्दिक संपत्ती असे म्हणतात. कंपनीचे बोधचिन्ह हे सुध्दा बौध्दिक संपत्ती समजण्यात येते.

        बोधचिन्ह (Logo) हे कंपनी वापरत असलेला ट्रेडमार्क किंवा चिन्ह असते.

        अशा अनेक बाबी आहेत ज्या प्रत्यक्ष संपत्ती बौध्दिक संपत्ती अशा दोन्ही आहेत. उदा. चित्र काढणे ही प्रत्यक्ष संपत्ती आणि बौध्दिक संपत्ती आहे. तुम्ही चित्र पाहाता, त्यास स्पर्श करता जी प्रत्यक्ष संपत्ती आहे आणि कलाकाराचा सर्जनशील विचार ही बौध्दिक संपत्ती आहे.


कॉपीराईट (Copyright)

        तुम्हाला तुमच्या बौध्दिक संपत्तीच्या मालकीच्या अधिकार आहे. बौध्दिक संपत्तीची मालकी मिळविण्यासाठी त्याची नोंदणी करणे आवश्यक असते. बौध्दिक संपत्तीच्या कायदेशीर नोंदणीस कॉपीराईट म्हणतात.

कॉपीराईट © हे या चिन्हा द्वारे दर्शविण्यात येते.

        तुम्हाला माहित आहे की पुस्तक हे प्रत्यक्ष संपत्ती आहे आणि त्यामधील तपशील, बौध्दिक संपत्ती आहे. त्या पुस्तकाच्या लेखकाला त्यासाठी हक्क म्हणजेच कॉपीराईट मिळतात त्यामुळे त्या पुस्तकातील मजकुराची कोणतीही कॉपी करू शकत नाही.

        कंपनीचे बोधचिन्ह हे सुध्दा बौध्दिक संपत्ती आहे. या बोधचिन्हांची कायदेशीर नोंदणी करतात, ज्यामुळे त्यांचा उपयोग करू शकत नाही. कंपनीचे बोधचिन्ह हे त्या कंपनीची निर्मिती असते आणि कंपनीकडे त्या चिन्हाची पूर्ण मालकी असते आणि त्याची कोणीही कॉपी करू शकत नाही असे घोषीत करण्याचा त्या कंपनीला अधिकार असतो. यास कॉपीराईट असे संबोधतात.

Intellectual Property


कॉपीराईट कायदे (Copyright Laws)

        बहुतेक देशांनी, बौध्दिक संपत्ती संरक्षणासाठी विशिष्ट कायदे तयार केलेले आहेत. या कायद्यांना कॉपीराईट कायदे म्हणतात.

        कॉपीराईट कायदे हे बौध्दिक संपत्तीच्या मालकांना काहि अधिकार आणि संरक्षण देतात. बौध्दिक संपत्तीचे मालक किंवा निर्मात्यांना त्यांच्या बौध्दिक संपत्तीवर पूर्णपणे अधिकार असतात. एखाद्याने मालकाच्या परवानगीशिवाय त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तिविरुध्द बौध्दिक संपत्तीचा निर्माता कायदेशीर कारवाई करू शकतो.

        दुसऱ्यांची बौध्दिक संपत्ती वापरण्याचा एकच मार्ग म्हणजे ती संपत्ती तयार करण्याऱ्याची त्यासाठी परवानगी घेणे. काही वेळा तुमच्या प्रकल्पामधील श्रेयनामावलीत बौध्दिक संपत्तीचा निर्माता त्याची नोंद घेण्याविषयी सांगतो, ज्यामुळे त्या बौध्दिक संपतीचे श्रेय त्या निर्मात्यास जाते.

1. Computer Crimes (संगणकीय गुन्हे) ! 

2.  माहितीची सुरक्षितता (Data Security)

3Technical masterminds. Technical Failure टेकनीकल त्रुटी

सॉफ्टवेअर चौर्य (Software Piracy)

        सॉफ्टवेअर हे सुध्दा बौध्दिक संपत्ती आहे. सॉफ्टवेअरचे निर्माते हे त्या सॉफ्टवेअरचे कॉपीराईट मिळवू शकतात. त्यांनी तयार केलेले सॉफ्टवेअर विकून या निर्मात्यांना पैसा मिळवायचा असतो. लोकांनी मूळ किंवा अस्तल सॉफ्टवेअर विकत घ्यावे अशी त्यांची इच्छा असते. परंतु काही लोक या सॉफ्टवेअरच्या बेकायदेशीरपणे प्रती तयार करताता आणि बाजारात विकतात. निर्मात्याच्या परवानगीशिवाय कॉपिराईट असलेल्या सॉफ्टवेअर प्रती तयार करणे याला सॉफ्टवेअर चौर्य किंवा सॉफ्टवेअर पायरसी असे म्हणतात. भारत सरकारने सॉफ्टवेअर चौर्यविरोधात कडक कायदे तयार केलेले आहेत. हे कायदे लोकांना कॉपीराईट असलेल्या सॉफ्टवेअरची नक्कल करुन विकण्यास प्रतिबंध करतात. एखाद्याकडे पायरेटेड सॉफ्टवेअर आढळल्यास त्याच्या विरूध्द खटला चालविण्यास हे कायदे परवानगी देतात.

या कायद्यानुसार, पायरेटेड सॉफ्टवेअर वापरणाऱ्या व्यक्तिस :- 

1. त्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यास थांबविण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते.

2. रु. २ लक्षपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

3. 3 वर्षापर्यंत तुरु्ंगवासाची शिक्षा होऊ शकते.


मूळ किंवा अस्सल सॉफ्टवेअरची गरज (Need for Original Software)

        मूळ म्हणजे अस्सल सॉफ्टवेअरचा वापर करण्यास आणि त्याच्या बेकायदेशीर प्रती न करण्यास अनेक कारणे आहेत. मूळ किंवा अस्सल सॉफ्टवेअर वापरण्याची गरज खालील कारणांसाठी असते. :- 


गुणवत्तेची हमी (Quality Assurance)

        जर अस्सल सॉफ्टवेअर खरेदी केले तर त्याचा वापरासंबंधी काही माहिती हवी असल्यास ती त्यांच्या उत्पादकाकडून मिळू शकते. सर्व उत्पादक त्याच्या ग्राहकांसाठी अशा प्रकारच्या सुविधा पुरवतात.


व्हायरसेस (Viruses)

        अस्सल सॉफ्टवेअर वापरण्याचे दुसरे महत्वाचे कारण व्हायरसची भीती. पायरेटेड म्हणजेच नकली किंवा चोरलेल्या सॉफ्टवेअरमध्ये धोकादायक व्हायरसेस असण्याची शक्यता असते, जो तुमचा संगणक आणि त्यामध्ये साठवलेल्या डेटास हानी पोहोचवू शकतात. अस्सल सॉफ्टवेअरचे उत्पादक हे त्या सॉफ्टवेअरची व्हायरसेस संबधी तपासणी करतात त्यामूळे अस्सल सॉफ्टवेअरचा वापर करणे सुरक्षित असते.


सुधारित सॉफ्टवेअरची निर्मिती (Production of Improved Software)

        अस्सल सॉफ्टवेअर विकत घतल्यामुळे कंपन्यांना अधिक चांगले तयार करण्यास प्रोत्साहन मिळते. पायरेटेड म्हणजेच नकली सॉफ्टवेअर खरेदी केल्यामूळे कंपनीची विक्री कमी होते आणि त्यामूळे नफाही कमी होतो. त्यामुळे नविन आणि अधिक चांगले सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी कंपनी पैसा गुंतवू शकत नाही.


नैतिक बंधन (Moral Obligation)

        अस्सल सॉफ्टवेअर खरेदी करण्यामागे नैतिक बंधन हे आणखी एक महत्वाचे कारण आहे. समाजाचा एक घटक म्हणून तुम्ही इतरांच्या सर्जनशीलतेचा म्हणजेच निर्मितीचा आदर केला पाहिजे आणि त्याच्या वापराची किंमती मोजली पाहिजे. तुम्ही ज्या समाजात राहाता त्या समाजाची फसवणूक करण्याची संस्कृती वाढवू नये.


आता तूम्ही जाणता  (Now you Know)

1. एखद्या व्यक्तीची किंवा सर्जनशीलता म्हणजे बौध्दिक संपत्ती.

2. बौध्दिक संपत्तीची कायदेशीरदृष्टया नोंदणी करण्यास कॉपीराईट म्हणतात.

3. कॉपीराईट © हे या चिन्हाद्वारे दर्शविले जाते.

4. कॉपीराईट कायद्याद्वारे बौध्दिक संपत्तीच्या मालकास काही अधिकार आणि संरक्षण दिले आहेत.

5. सॉफ्टवेअर निर्मात्याच्या परवानगीशिवाय कॉपीराईट असलेल्या सॉफ्टवेअरच्या प्रती तयार करण्यास सॉफ्टवेअर चौर्य किंवा सॉफ्टवेअर पायरसी असे म्हणतात.

6. मूळ सॉफ्टवेअर वापरण्याची आवश्यकता खालील बाबींसाठी असते :-

अ. उत्पादकांकडून गुणवत्तेची हमी

ब. व्हायरसविरहित सॉफ्टवेअर

क. उत्पादकांकडून सुधारित सॉफ्टवेअरची निर्मीती

ड. आपल्यासाठी नैतिक बंधन

         हे आर्टिकल जर तुम्हाला आवडला असेल व अश्या टेक्नीकल क्नॉलेजसाठी आमच्या ब्लाग ला swapnilr88.blogspot.com नक्की करा , जेनेकरून तुम्हाला पूढील माहीती व आमच्या ब्लॉग ची नोटीफीकेशन सर्वात आधी मिळेल.

धन्यवाद !

Swapnil Raut

This blog is related to Education purpose and in this blog "Education and Health" related post are there.

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने