आरोग्याच्या समस्या (Health Problems)
उद्देश (Objectives)
ह्या तासाच्या शेवटी तुम्हाला शक्य होईल :-
1. संगणकाच्या स्वास्थाला धोका कसा निर्माण होतो ते सांगा.
2. कार्पल टनेल सिन्ड्रोम सांगा.
3. संगणकामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या सांगा.
संगणक आपल्याला बरेच उपक्रम करण्यासाठी मदत करतो आणि तंत्रज्ञानातील समस्या सुध्दा सोडवितो. तरीसुध्दा, जर ते जास्त वेळ चालवले तर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. ह्या सत्रात तुम्हांला संगणकाकडून होणाऱ्या वेगवेगळया शारिरीक समस्ये बद्दल माहिती कळेल आणि अशा समस्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सल्ले दिले जातील.
कार्पल टनेल सिंड्रोम (Carpal Tunnel Syndrome)
कार्पल टनेल सिंड्रोम किंवा CTS - ही मेडिकल समस्या आहे ज्यात हातातील मनगटांत आणि बोटांमध्ये गोळा येतो.
ही समस्या जेवहा मधली नस व्यस्थित काम करत नसेल तेव्हा येते. सामान्यपणे, हे होण्याचे कारण म्हणजे तेथील नसेवर मनगट चालवताना खूप जास्त ताण असतो. त्यामुळे त्याला हातातील कार्पल टनेल असे म्हणतात.
भटकण्याच्या वेळी हाताच्या परत परत होणा-या जलद हालचालीमुळे हा सिंड्रोम होण्याची शक्यता वाढते. त्याने मनगट आणि बोटांवर थोडीशी सूज येते. त्यामुळे मनगटातील हाडांमध्ये लचक भरते, आणि दुखायला लागते.
कार्पल टनेल सिंड्रोमला रोखणे (Preventing Carpal Tunnel Syndrome)
जेव्हा तुम्ही संगणकावर जास्त वेळ काम करता तेव्हा हाताचे व्यायाम करून स्वत:ला कार्पेल टनेल सिंड्रोम पासून वाचवू शकता. इथे सिंड्रोम पासून वाचण्यासाठी काही सल्ले दिले आहेत.
1. जेव्हा कि-बोर्ड वापरत असता तेव्हा तुमचे शरीर आणि मनगटाची मुद्रा तटस्थ ठेवा.
2. संगणकावर दिर्घकाळ काम असेल तर नियमीत ब्रेक घ्या.
3. सहजपणे तुमचे मनगट आणि बोटांना ताण घालवण्यासाठी सैल सोडा.
4. रिकाम्या वेळात तुमची हाताची जागा थोडी बदला.
अशा काही उपकरणे आहेत जी तुमची कार्पल टनेल सिंड्रोमपासून सुरक्षा करु शकतात.
1. ट्रॅकबॉल
2. एरगोनॉमिक कि-बोर्ड
ट्रॅकबॉल (Trackball)
माऊस हे सगळयात प्रसिध्द पॉईंन्टीग उपकरण आहे. माऊसचा दिर्घकाळ वापरसुध्दा तुमच्या हातात ताण उत्पन्न करु शकतो जो कदाचित कार्पेल टनेल सिंड्रोम असू शकेल. तेथे बऱ्याच प्रकारचे एरगोनॉमिक माऊस उपलब्ध आहेत.
पारंपारिक माऊसमध्ये, ट्रॅकबॉल हा खाली असतो. एरगोनॉमिक माऊसमध्ये ट्रॅकबॉल हा वरिल पृष्ठभागावर असतो. इथे तुम्ही माऊसला हलवण्याशिवाय फक्त बॉलला करसरला स्क्रिनवर सरकवण्यासाठी हलवता.
एरगोनॉमिक कि-बोर्ड (Ergonomic Keyboards)
बाजारात असे काही कि-बोर्ड आहेत की जे तुमच्या हाताच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. तेथे खास असे एरगोनॉमिक कि-बोर्ड आहेत ते मनगटावरीत ताण हलका करतात. बाजारातील बरेच एरगोनॉमिक कि-बोर्ड हे स्प्लिट कि-बोर्ड आहेत, ज्यात अल्फान्युमेरिक कि ह्या विशिष्ट कोनात असतात.
मुख्यता करुन मनगटांसाठी बनवले आहेत.
तुम्ही माऊस किंवा कि-बोर्ड वापरतांना तुमच्या मनगटाला आधार देण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी स्टायरोफोम मनगटीय पॅडसुध्दा वापरू शकता. बरेच कि-बोर्ड हे मनगटीय आरामासाठीचे प्लॅस्टिकचे पॅड जोडून येतात. मनगटीय विश्रांतीचे पॅड वापरणे हे हातांच्या आधारासाठी आरामदायक आणि प्रभावशिल आहे. तेथे काही घटना आहेत ज्या मनगटीय आधार वापरतात ते कार्पल टनेल सिंड्रोमची लक्षणे कमी करण्यासाठी वापरतात.
अन्य समस्या (Other Problems)
कार्पल टनेल सिंड्रोम शिवाय, तेथे अजून बरेच आजार आहेत जे लोकांना संगणकावर आरामात काम करू देत नाहीत. त्यापैकी कामी समस्या होऊ नयेत म्हणून काही सल्ले.
मानेचे दुखणे (Neck Pain)
जे लोक संगणकावर खूप तासांसाठी बसतात त्यांना मानेचे आणि खांद्यांचे दुखणे सतावते. हयाचे कारण ते काम करतांना मॉनीटरवर झूकून काम करतात. जर ते ह्या अवस्थेत खूप वेळ बसले, तर त्यांच्या मानेच्या आणि खांद्याच्या मांसपेशी ह्या मानेतील नसांवर वाकून त्रास होतो. हेच खांद्यांच्या मांसपेशीसाठी सुध्दा दुखेल जरी ते संगणकावर काम करित नसले.
मानेचे दुखणे थांबविणे (Preventing Neck Pain)
टाईपिंग करतानाची खराब अवस्था ही मानेचे आणि खांद्यांचे दुखणे पैदा करू शकते. तुम्ही संगणकावर काम करताना तुमच्या बसण्याच्या अवस्थेत बद्दल जागरुक असले पाहिजे. इथे काही सल्ले दिले आहेत जे मान आणि खांद्याचे दुखणे थांबवतात.
1. तुमची मान सरळ ठेवा. तुमचे डोळे हे सुध्दा स्क्रीनवरील बिंदूकडे जो मॉनीटरच्या २ ते ३ इंच खाली असेल. जर मॉनीटर ह्या उंचीपेक्षा वर किंवा खाली असेल, तर तुमची मान वर किंवा खली असेल, त्याने मानेचे दूखणे येऊ शकते. जर शक्य असेल तर खूर्ची किंवा टेबलची उंची सुधारा.
2. तुम्ही तुमच्या मानेचे आणि खांद्याचे स्नायू वर खाली आणि मान गोल फिरवून सैल करू शकता, प्रत्येक वेळा तीन सेकंद थांबा. ही कृती बऱ्याच वेळा परत करा.
3. पुस्तके किंवा डॉक्युमेंटमधून टाईप करताना, लक्षात घ्या की ते डॉक्युमेंट होल्डर स्क्रीनच्या जवळ असेल.
4. मॉनीटर तुमच्या समोर ठेवा, आणि डावीकडे किंवा उजवीकडे वळवू नका.
पाठीचे दुखणे (Back Aches)
जर तुम्ही संगणकावर जास्त वेळ काम करत असाल, तर तुम्हाला तुमच्या खालील पाठीत वेदना जाणवेल. ह्याचे कारण की तुमचे पाठीचे स्नायू हे तुमचे शरीर सरळ ठेवण्यासाठी झगडत असतात. खूर्चीच्या चुकीच्या वापराने तुमच्या पाठीत वेदना होऊ शकते.
लोक जे चष्मे घालतात ते पुढे वाकून बघतात, ज्यामुळे पाठीत वेदना होतात. जरी व्यवस्थित दिसत असले तरीसुध्दा सवयीच्या परिणामाने हे होऊ शकते.
पाठिचे दुखणे थांबवणे (Preventing Back Aches)
जरी तेथे दुखण्यावर बरीच औषधे असली, तरी तुम्ही तुमची पाठदुखी काळजी घेऊन थांबवू शकता.
1. खात्री द्या की तुम्ही खूर्चीत नेहमी सरळ बसाल दोन्ही तळवे जमिनीला टेकलेल्या अवस्थेत.
2. खात्री द्या की तुम्ही प्रसंगानुरूप उभे रहाल, चालाल आणि स्वत:ला ताणाल.
3. आरामशीर आणि ठिक करता येण्याजोगी खुर्ची वापराल.
4. खात्री द्या की तुमच्या वरील आणि खालील पाठिला खूर्चीचा आधार आहे.
5. खूर्चीची उंची अशा प्रकारे योग्य करा की गुडघे वाकले जाणार नाहीत.
डोळयावरील ताण (Eyestrain)
आयटी जगातील सर्वसामान्य समस्या डोळयांवरील ताण. संगणकाचे स्क्रिनवर जास्त वेळ बघितल्याने डोळयांवर परिणाम होतो. डोळयांवरील ताणाची काही लक्षणे :-
1. लाल डोळे
2. डोळयांमध्ये वेदना
3. अंधुक दिसणे
डोळयातील ताण थांबविणे (Preventing Eye Strain)
संगणकाचे स्क्रिनवर जास्त वेळ बघितल्याने डोळयांवर ताण येतो. तुम्हांला अंधूक दिसण्या पासून आणि लाल डोळयां पासून वाचण्यासाठी, तुम्हांला संगणकाचे स्क्रिनवर बघताना नियमीत ब्रेक घ्यावा लागतो.
1. प्रत्येक १५ मिनिटांनंतर तुम्ही संगणकाच्या स्क्रिन पासून १ किंवा २ मिनीटे दूर बघितले पहिजे. लांबचे दृष्य, खोलीच्या दुस-या बाजूला किंवा खिडकीतून बाहेर, हे डोळयाच्या आतील स्नायूंना सैल करतात.
2. तेथे स्क्रिनवर कोणताही प्रकाश पडू नये. चांगल्या प्रतीची प्रकाशाला मज्जाव करणारी काच घेणं चांगले असतो. जर चुकीचे असे काही असेल तर डोळयांवर ताण येऊ शकतो.
3. काही सेकंदांसाठी तुमच्या डोळयांच्या पापणांची उघडझाप करा. हे अश्रृंच्या नलिका मोकळया करतात आणि डोळयांच्या पृष्ठभागावरील धूळ साफ करतात.
4. तुमचे डोळे बंद करा आणि त्यांना कडे-कडेने गोल फिरवा.
तुम्ही तुमच्या मॉनीटर पासून व्यवस्थित अंतरावर बसला आहात ह्याची खात्री करून घ्या.
आता तुम्हाला माहित आहे (Now You Know)
1. संगणक जास्त वेळ चालवले तर शारिरिक समस्या निर्माण होऊ शकतात.
2. संगणकावरील कि-बोर्ड आणि माऊसच्या अयोग्य वापरामुळे कार्पल टनेल सिंड्रोम होऊ शकते.
3. कार्पल टनेल सिंड्रोमने मनगट आणि बोटांवर थोडीशी सूज येते, ज्यामुळे दुखणे उदभवते.
4. तेथे काही उपकरणे आहेत जी तुमच्या कार्पल टनेल सिंड्रोमला सुरक्षा देतो, ते आहेत :-
अ. ट्रॅकबॉल
ब. एरगोनॉमिक कि-बोर्ड
5. ट्रॅकबॉल हे साधे उपकरण आहे, ह्यात तुम्ही माऊस हलवण्याशिवाय, माऊसवरिल बॉल करसरला सरकवण्यासाठी हलवाल.
6. एरगोनॉमिक कि-बोर्ड वापरुन मनगटावरील ताण सैल करता येतो.
7. तुम्ही माऊस किंवा कि-बोर्ड वापरताना तुमच्या मनगटाला आधार देण्यासाठी स्टायरेफोम मनगटीय पॅड सुध्दा वापरू शकता.
8. पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे आणि डोळयांवरील ताण हा कॉम्पुटर जास्त वेळ वापरल्याने होतो.
हे आर्टिकल जर तुम्हाला आवडला असेल व अश्या टेक्नीकल क्नॉलेजसाठी आमच्या ब्लाग ला नक्की करा , जेनेकरून तुम्हाला पूढील माहीती व आमच्या ब्लॉग ची नोटीफीकेशन सर्वात आधी मिळेल.
धन्यवाद !
👍👍👌
जवाब देंहटाएं