Basic of Hotmail 1 | हॉटमेलसंबंधी प्राथमिक - १

हॉटमेलसंबंधी प्राथमिक - १ (Basic of Hotmail)

प्रस्तावना
        इमेल ही संज्ञा इलेक्ट्रॉनिक मेलचे लघुरूप आहे. इंटरनेटवर मोठया प्रमाणात वापरले जाणारे असे हे वैशिष्टये आहे. इंटरनेटवरुन पत्रे पाठविण्यास इमेल म्हणतात. पोस्टाच्या तुलनेत हे वेगवान असल्याने अधिक लोकप्रिय आहे. तसेच पोस्टेजही लागत नाही त्यामुळे स्वस्त आहे. तसेच याद्वारे संदेश पाठविण्यात आणि मिळविण्यात दिरंगाईसुद्धा होत नाही.
        इमेल पाठविणे आणि मिळविण्यासाठी साईन इन (Sign In) नाव आवश्यक असते. साईन इन नाव किंवा इमेल ॲड्रेस हा अक्षर व अंकांचे (Alphanumeric) एकत्रिकरण असते. हा पत्ता बँक खाते क्रमांकासारखाच असतो फक्त इमेल पत्यामध्ये अक्षरे आणि अंक एकत्रित असतात. ज्याप्रमाणे प्रत्येक बँक खाते क्रमांक स्वतंत्र असतो त्याप्रमाणे इमेल पत्ताही स्वतंत्र असतो. इमेल सेवा पुरवठादार अनेक आहेत. उदा. हॉटमेल, याहू आणि रेडीफ. साईन इन नावाल विशिष्ट व्यक्तीची युजर आयडी किंवा इमेल ॲड्रेस असेही म्हणतात.
ईमेल पत्त्याची उदाहरणे खाली दिलेली आहेत.
i) Ram22@hotmail.com
ii) Shyam_56rediffmail.com
iii) Deepak@yahoo.com
        वरील उदाहरणात, नावांच्या पुढे @ हे चिन्ह आहे. आणि त्यापुढे सेवा पुरवठादाराचे नाव आहे. उदा. Hotmail.com किंवा rediffmail.com.


विंडोज लाईव्ह हॉटमेल मिळविणे

इंटरनेट मिळविण्यासाठी,
१. Start बटणावर क्लिक करा.
२. Start मेन्यूमधील Internet Explorer पर्याय निवडा.
ब्राऊझर विंडो दिसेल.
Windows Live Hotmail मिळवा.
i) ॲड्रेस बारमध्ये www.hotmail.com टाईप करा आणि Enter की दाबा.
(या ठिकाणी तुम्हाला हव्या असलेल्या वेबसाईचे नाव तुम्ही टाईप करु शकता) 
लॉगीन स्क्रिन येईल.
ii) Windows Live ID आणि पासवर्ड संबंधित बॉक्सेसमध्ये टाईप करा.
iii) Sign in बटणावर क्लिक करा.

Hotmail Login


        आयडी आणि पासवर्ड हे दोन्ही बरोबर असल्याची तपासणी हॉटमेल करेल आणि जर बरोबर असतील तर तुम्हाला मेलबॉक्स मिळेल. आता तुम्ही या मेलबॉक्सद्वारे संदेश पाठवू आणि मिळवू शकता.
* पहिल्यांदा जेव्हा युजर्सना लॉगिन आयडी नसेल तेव्हा साईनिंग करुन नवीन लॉगिन आयडी तयार करावा लागेल.


संदेश वाचणे

        इनबॉक्स हे असे ठिकाण आहे ज्यामध्ये तुम्हाला प्राप्त झालेले सर्व संदेश साठविले जातात. तुम्ही ते संदेश केव्हाही मिळवू शकता, वाचू शकता किंवा इतरांना फॉरवर्ड करु शकता किंवा इनबॉक्समधून काढून टाकू शकता.
संदेश वाचण्यासाठी,
१. Mail टॅबवर क्लिक करा.
        मेलबॉक्समध्ये असलेले सर्व संदेश यादीच्या स्वरुपात दिसतील. नवीन प्राप्त झालेले संदेश त्याच्या शेजारी छोटया लिफाफ्याच्या आयकॉन्ससह दिसतील. पाठविणाऱ्याचे नावही ठळक अक्षरात दिसेल.

Hotmail Message Reading


इनबॉक्समध्ये चार कॉलम्स असतात. ते म्हणजे From, Subject, Date आणि Size. From कॉलममध्ये ज्या व्यक्तीने संदेश पाठविला तिचा इमेल पत्ता असतो. Subject कॉलममध्ये संदेशाचा विषय असतो. Date कॉलममध्ये संदेश कोणत्या तारखेस पाठविण्यात आला ती तारीख असते आणि Size कॉलममध्ये संदेशाचा एकूण आकार दिसतो.
२. पाठविणाऱ्याच्या नावावर क्लिक करा.
        मेल संदेश नवीन पृष्ठात दिसेल.


संदेश पाठविणे

संदेश पाठविण्यासाठी,
१. New बटणावर क्लिक करा.
New Mail Message विंडे दिसेल.
२. To : टेक्सट बॉक्समध्ये प्राप्तकर्त्याचा इमेल पत्ता टाईप करा.
३. Subject : टेक्सट बॉक्समध्ये संदेशाचा विषय टाईप करा.
४. Cc : फील्डमध्ये ज्या व्यक्तीस इमेलची प्रत पाठवायची आहे तिचा इमेल पत्ता टाईप करा.
५. ज्याचा पत्ता इतरांना दिसू नये असे तुम्हाला वाटते त्यांचा इमेल पत्ता Bcc : मध्ये टाईप करा.
६. मेसेस एरियामध्ये संदेश टाईप करा.
लक्षात ठेवा कि अनेक इमेल पत्ते हे स्वल्पविराम (,) किंवा अर्धविराम (;) यांनी वेगळे करतात. जो मोठा पांढरा बॉक्स असतो तो मेसेज टेक्स्टबॉक्स असतो.
या ठिकाणी संदश टाईप केला जातो.
७. संदेश पाठविण्यासाठी Send बटणावर क्लिक करा.
संबंधित व्यक्तीस मेसेज पाठविल्याचा संदेश, "e-mail has been sent" दाखविला जाईल.
८. इनबॉक्समध्ये परत जाण्यासाठी Return to Inbox लिंक वर क्लिक करा.


ड्राफ्ट सेव्ह करणे

        Drafts फोल्डरमध्ये तयार केलेले परंतु न पाठविलेले संदेश असतात. Drafts फोल्डरमध्ये संदेश साठविण्यासाठी, संदेश तयार केल्यावर Save Draft बटणावर क्लिक करा.
        Drafts फोल्डरमधील संदेश पाहण्यासाठी. डाव्या भागातील फोल्डर्स भागातील Drafts पर्यायावर क्लिक करा. Drafts फोल्डरचा तपशील दिसेल.



Swapnil Raut

This blog is related to Education purpose and in this blog "Education and Health" related post are there.

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने