रिपोर्ट्स तयार करणे आणि वापरणे (Creating and Using Reports)
साधा रिपोर्ट तयार करणे (Creating a Simple Report)
एमएस ॲक्सेस २००७ मध्ये रिपोर्ट हे एक डेटाबेस ऑब्जेक्ट आहे. त्यांचा उपयोग प्रिंट स्वरुपातील डेटा सादर करण्यासाठी केला जातो. क्वेरीवर आधारित निवडक फील्डसचा रिपोर्ट तयार करणे शक्य असते. केवळ विशिष्ट रेकार्डसचा रिपोर्ट, तयार करता येतो. यासाठी रिपोर्टध्ये क्वेरी देता येतो.
मायक्रोसॉफ्ट ऑफिस ॲक्सेस २००७ मध्ये, साध्या रिपोर्ट पासून रिपोर्टसारखे वेगवेगळे रिपोर्टस तयार करता येतात. आधी डेटा असलेल्या टेबल्स किंवा क्वेरिजमधील जी फील्ड्स रिपोर्टमध्ये घ्यायची आहेत, ती निवडणे आवश्यक असते. त्यानंतर रिपोर्ट विझार्ड वापरुन तयार करणे सोपे होते ॲक्सेसमधील रिपोर्ट विझार्ड हे वैशिष्ट्य प्रश्नांच्या मालिकेमध्ये मार्गदर्शन करते आणि त्यांच्या उत्तरावर आधारित रिपोर्ट तयार होतो.
रिपोर्ट विझार्ड वापरून रिपोर्ट्स तयार करणे (Creating Reports Using Reports Wizard)
रिपोर्ट विझार्ड आणि डिझाईन पर्याय वापरुन रिपोर्ट्स तयार करता येतात.
रिपोर्ट तयार करण्याच्या पायऱ्या
1. रिपोर्ट्स ग्रुपमधील, क्रिएट टँबवरील रिपोर्ट विझार्डवर क्लिक करा.
2. रिपोर्ट विझार्ड बॉक्समधील टेबल्स / क्वेरिज ड्रॉप-डॉऊन लिस्टमधील टेबल किंवा क्वेरी निवडा.
3. सिलेक्टेड फील्ड्स हलवण्यासाठी अव्हेलेबल फील्ड्स कॉलममधील योग्य त्या फील्ड्सवर डबल क्लिक करा.
4. नेक्स्ट (Next) बटनावर क्लिक करा.
5. आवश्यकता असल्यास बॉक्समधील ग्रुप लेव्हलस निवडा.
6. नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
7. ड्रॉप डाऊन लिस्टमधील फील्डस सॉर्ट करण्यासाठी निवडा.
8. नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
9. डायलॉग बॉक्समधील लेआऊट निवडा.
10.नेक्स्ट (Next) बटणावर क्लिक करा.
11. डायलॉग बॉक्समधील स्टाईल निवडा.
12. नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
13. दिलेल्या टेक्सट बॉक्समध्ये योग्य ते शीर्षक घाला.
14. रिपोर्ट तयार करण्यासाठी फिनिश बटणावर क्लिक करा.
टीप :- वेगवेगळया टेबल्स आणि क्वेरिजमधील फील्ड्स रिपोर्टमध्ये घालण्यासाठी रिपोर्ट विझार्डमधील पहिल्या पानावर पहिल्या टेबल किंवा क्वेरीमधील फील्ड्स निवडल्यावर नेक्स्ट किंवा फिनिशवर क्लिक करु नका. त्याऐवजी, टेबल किंवा क्वेरी निवडण्याच्या पायऱ्या वारंवार करा आणि अधिक फील्ड्स रिपोर्टमध्ये घालण्यासाठी त्यावर क्लिक करा. शेवटी नेक्स्ट बटण दाबा किंवा फिनिश बटण दाबा.
रिपोर्ट डिझाईन वापरुन रिपोर्टस तयार करणे ( Using Report Design Create Reports)
रिपोर्ट डिझाइन पर्याय वापरुन रिपोर्टस तयार करण्याच्या पायऱ्या
1. नॅव्हिगेशन पेन भागात, रिपोर्टमध्ये जो डेटा घ्यायचा आहे त्यांचा टेबल किंवा क्वेरिवर क्लिक करा.
2. रिपोर्ट ग्रुपमधील क्रिएट टॅबवरील रिपोर्ट डिझाईन वर क्लिक करा.
3. ॲक्सेस रिपोर्ट तयार करतो आणि तो डिझाईन व्हयूमध्ये दाखवतो.
4. टूल्स ग्रुपमधील डिझाईन टॅबवरील ॲड एक्झिस्टिंग फील्ड वर क्लिक करा.
5. रिपोर्टमध्ये आणण्यासाठी योग्य त्या फिल्डसवर क्लिक करा किंवा ड्रॅग करा.
6. रिपोर्ट सेव्ह (Save) करा.
7. व्हयू ग्रुपमधील होम टॅबवरील व्हयूवर क्लिक करा.
8. यादीमधील रिपोर्ट व्हयूवर क्लिक करा.