ईमेल अटॅचमेंटबरोबर काम करणे (Working with an Email Attachment) - SR Education (IcT) Tech
अटॅचमेंट (Attachment)
अटॅचमेंट म्हणजे एक फाईल असुन ती इमेल संदेशासोबत पाठविली जाते. ती पिक्चर फाईल किंवा डॉक्यूमेंट अटॅचमेंटसह संदेश असल्यास त्या बॉक्सपुढे जेम क्लिप असते.
१. इमेल संदेश उघडा.
२. अटॅच केलेल्या फाईलच्या लिंकवर क्लिक करा.
File Download डायलॉग बॉक्स दिसेल.
३. Open बटणावर क्लिक करा.
अटॅचमेंट सेव्ह करण्यासाठी, save बटणावर क्लिक करा. आणि त्या फाईलसाठी लोकेशन द्या.
अटॅचमेंटस पुढे पाठविणे (Forwarding Attachments)
जेव्हा अटॅचमेंटसह इमेल पुढे पाठविला जातो तेव्हा नेहमीचा इमेल संदेश पाठविण्याची जी पद्धत आहे तीच अवलंबावी लागते. त्यामूळे अटॅचमेंट आपोआप पुढे पाठविली जाते.
अटॅचमेंट पाठविणे. (Sending E-mail Attachments)
इमेल संदेशाला फाईल जोडण्यासाठी,
१. New बटणावर क्लिक करा.
२. Attach बटणावर क्लिक करा.
३. दिसणाऱ्या यादीमधून फाईल निवडा.
Attach File पृष्ट दिसेल.
४. पाठवायची फाईल शोधण्यासाठी Browse बटणावर क्लिक करा. Choose File डायलॉग बॉक्स दिसेल.
५. योग्य ठिकाणावरील फाईल निवडा आणि Open बटणावर क्लिक करा.
File टेक्सट बॉक्समध्ये फाईलचा पाथ दिसेल.
६. फाईल जोडण्यासाठी Attach बटणावर क्लिक करा.
* अनेक फाईल्स जोडण्यासाठी तुम्ही Add more files पर्याय वापरू शकता. एकदा फाईल जोडली गेल्यावर फाईलचे नाव, संदेश पृष्ठावरील Attachments टेक्स्ट बॉक्समध्ये दिसेल.
७. इमेल ॲड्रेस घाला आणि Send बटणावर क्लिक करा.
फोल्डर्स चे नाव बदलणे (Renaming Folders)
आधी तयार केलेल्या फोल्डर्सची नावे केव्हाही बदलता येतात.
फोल्डरचे नाव बदलण्यासाठी,
१. Manage Folders लिंकवर क्लिक करा. फोल्डर पृष्ट दिसेल.
२. ज्या फोल्डर्सचे नाव बदलायचे ते निवडा.
३. Rename बटणावर क्लिक करा. Rename Folder पृष्ट दिसेल.
४. Folder Name टेक्स्टबॉक्समध्ये नवीन नाव टाईप करा.
५. Save बटणावर क्लिक करा.