Create a form by using the Form tool :- फॉर्म टूल वापरून फॉर्म तयार करा Microsoft office
फॉर्म हे डेटाबेस ऑब्जेक्ट असून त्याचा उपयोग टेबल किंवा क्वेरीमध्ये डेटा घालणे, त्यात बदल करणे किंवा दाखवण्यासाठी केला जातो. फॉर्मसचा उपयोग फील्डसमधील रेकॉर्डस दाखविण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा डेटा मिळवण्यावर नियंत्रण आणण्यासाठी करता येतो.
उदा. काही युजर्सना केवळ टेबलमधील विशिष्ट फील्ड्स पाहण्याची आवश्यकता असते. अशावेळी अशी फील्ड्स असलेला फॉर्म्स देऊन यूजर्स तो डेटाबेस सहपणे वापरू शकतात. या फॉमसमध्ये बटणे आणि इतर क्रिया करण्यासाठी बाबी घालून नियमित कराव्या लागणा-या क्रियांचे स्वयंचलन करता येते.
मायक्रोसॉफ्ट ऑफिस ॲक्सेस २००७ मध्ये चटकन फॉर्म्स तयार करण्यासाठी आणि डेटाबेसची उपयोगिता वाढविण्या-या वैशिष्टयांसाठी साधने पुरविण्यात आली आहेत.
Create a form by using the Form tool :- फॉर्म पर्याय वापरून फॉर्म तयार करणे
फॉर्म पर्याय वापरुन फॉर्म तयार करण्याच्या पायऱ्या
1. नॅव्हिगेशन भागातील योग्य तो डेटा असलेले टेबल किंवा क्वेरीवर क्लिक करा.
2. फॉर्म्स ग्रुपमधील क्रिएट टॅबवरील फॉमवर क्लिक करा.
टीप :- जेव्हा हे साधन वापले जाते तेव्हा या डेटा सोर्समधील सर्व फील्ड्स फॉर्मवर येतात. गरजेनुसार लगेच सुरुवात करण्यासाठी नवीन फॉर्म वापरता येतो किंवा लेआऊट व्ह्यू किंवा डिझाइन व्ह्यूमध्ये त्यात बदल करता येतो.