Create a form by using the Form Wizard :- फॉर्म विझार्ड वापरुन फॉर्म तयार करणे
फॉर्म विझार्ड वारूनही फॉर्म तयार करता येतो जेव्हा केवळ विशिष्ट फील्डस फॉर्मवर हवी असतील तेव्हा फॉर्म विझार्ड वापरता येतो. डेटाचा गट कसा करायचा आणि सॉर्ट कसे करायचे हेसुध्दा देता येतो.
रिलेशनशिप असल्यास एकापेक्षा अधिक टेबल्स किंवा क्वेरिज वापरता येतात.
फॉर्म विझार्ड वापरुन फॉर्म तयार करण्याच्या पाय-या
1. फॉर्म्स ग्रुपमधील क्रिएट टँबवरील मोअर फॉर्म्स वर क्लिक करा आणि त्यानंतर फॉर्म विझार्डवर क्लिक करा.
2. फॉर्म विझार्ड डायलॉग बॉक्समधील टेबल्स /क्वेरिज ड्रॉप डाऊन लिस्टमधील टेबल किंवा क्वेरी निवडा.
3. सिलेक्टेड फील्ड्स कॉलमध्ये नेण्यासाठी, ॲव्हेलेबल फील्ड्स कॉलमधील योग्य त्या फील्ड्सवर डबल क्लिक करा.
4. नेक्सट बटणावर क्लिक करा.
5. डायलॉग बॉक्समधील लेआऊट निवडा.
6. नेक्सट बटणावर क्लिक करा.
7. डायलॉग बॉक्समधील स्टाईल निवडा.
8. नेक्सट बटणावर क्लिक करा.
9. दिलेल्या टेक्सट बॉक्समध्ये शीर्षक दया.
10. फॉर्म तयार करण्यासाठी फिनिशवर क्लिक करा.
टीप :- फॉर्मवर वेगवेगळया टेबल्स आणि क्वेरीजमधील फील्ड्स घालण्यासाठी फॉर्म विझार्डमधील क्वेरीमधील फिल्डस नेक्स्ट किंवा फिनिशवर क्लिक करु नका. त्याऐवजी इतर फील्ड्स घालण्यासाठी टेबल किंवा क्वेरी निवडण्याच्या पाय-या वापरा आणि संबंधित फील्ड्सवर डबल क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट किंवा फिनिश बटण दाबा.