The Quickest Way to Get Rich With an Overview of Database Management System in Marathi.

डेटाबेस व्यवस्थापन पध्दतीवर दृष्टिक्षेप . The Quickest Way to Get Rich With an Overview of Database Management System in Marathi.

उद्दिष्टे (Objectives)

या सत्राच्या अखेरीस तुम्ही या गोष्टी करू शकाल : 

  • डेटाबेस संकल्पना आणि परिभाषा स्पष्ट करणे.
  • डेटाबेस नियोजन आणि रचना करणे. 
  • एमएस ॲक्सेस 2007 ची प्रथामिक माहिती स्पष्ट करणे.
  • एमएस ॲक्सेस 2007 चे‍ हेल्प वैशिष्टय स्पष्ट करणे.‍


डेटाबेस संकल्पना.  Database Concept.

        भविष्यकालीन उपयोगासाठी विविध प्रकारचा डेटा साठविण्याकरिता डेटाबेसचा उपयोग केला जातो. डेटा अशा प्रकारे ठेवला जातो कि तो सहजगत्या उपलब्ध होईल आणि हव्या त्या स्वरुपात सादर करता येईल. डेटा नियमितपणे अद्ययावतही करावा लागतो. डेटा म्हणजे एखाद्या विषयाशी संबधित कच्च्या स्वरुपातील माहिती.


डेटाबेस (Database) 

        हा संरचना केलेल्या डेटाचा समूह असतो. उदा. ग्रंथालयाचा डेटाबेस हा पुस्तकांसंधतीच्या माहितीचे एकत्रिकरण असते.

        त्याचा उपयोग डेटा सहजगत्या उपलब्ध  होण्यासाठी आणि मिळवण्यासाठी डेटाची रचना करण्याकरता होतो.

हे असे ‍ठिकाण आहे जेथे डेटा आणि त्यासंबंधीची ऑब्जेक्टस साठवली जातात.

         यामध्ये माहितीची रचना अशा प्रकारे केली जाते कि संदर्भ माहित असल्यास कोणतीही विशिष्ट माहिती मिळू शकते.

        संगणक डेटाबेसमध्ये, डेटा वेगवेगळया स्वरुपात साठवला जातो ज्यामध्ये एका साध्या टेक्सच्या ओळी पासून चित्रे, आवाज किंवा व्हिडिओ यांसरख्या डेटाचाही समावेश होतो. डेटाबेसमध्ये माहिती अशा प्रकारे ठेवली जाते कि संदर्भ माहित असल्यास कोणत्याही माहितीचा भाग मिळवता येतो. उदा. ग्रंथालयाच्या डेटाबेसमध्ये, पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी बुक आयडी हा संदर्भ म्हणून वापरला जातो. घरातील ग्रंथालयामध्ये, प्रत्येक पुस्तकाची माहिती साध्या फाईल्समध्ये ठेवण्यात येते. अशा प्रकारे माहिती सोडवण्यासाठी साध्या पध्दतीपेक्षा डेटाबेस ठेवणे केव्हाही फायद्याचे ठरते.


डेटाबेस व्यवस्थापन पध्दत‍. Database Management system (DBMS).

        डेटाबेस व्यवस्थापनाचे डेटाबेस तयार करणे, त्यात बदल करणे, डेटा काढून टाकणे आणि नवीन डेटा घालने यांचा समावेश होतो. ज्या सॉफ्टवेअरमुळे ही कार्ये करता येतात त्याला डेटाबेस व्यवस्थापन पध्दती किंवा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम (DBMS) म्हणतात.

खालील लोकप्रिय DBMS आहेत :- 

  • एमएस ॲक्सेस
  • क्लिपर
  • फॉक्सप्रो
  • ओरकल



डेटाबेस व्यवस्थापन पध्दतीचे फायदे.  Profit of Database management system.

  • मोठया स्वरुपातील डेटा साठवता येतो.
  • गणन क्रिया वेगाने व अचूकतेने करता येते.
  • डटाची साठवणूक, त्यावर प्रक्रिया करणे आणि तो मिळवणे हे सुलभतेने करता येते.


डेटाबेसमधील टेबल्स.  Database Table.

        डेटाबेसमध्ये असलेली माहिती एक किंवा अधिक टेबल्समध्ये असते. टेबलसमधील डेटा ओळी आणि कॉलम्सच्या स्वरूपात असतात. डेटाबेसमधील प्रत्येक टेबल एक विषय दर्शवते. उदा. Library (ग्रंथालय) या डेटाबसमध्ये Book (पुस्तके) हे टेबल पुस्तकांची माहिती साठवण्यासाठी असू शकते. 

        विविध आळी आणि कॉलम्समध्ये टेबल विभागले जाते. उदा. बुक्स टेबलमधील प्रत्येक ओळीमध्ये पुस्तकाची माहिती असेल. या माहितीच्या ओळींना रेकॉर्डस संबोधतात. प्रत्येक रेकॉर्ड स्वतंत्र असून ते आवश्यकतेनुसार मिळवता येते.


फील्ड  (Field)

        टेबलमध्ये फील्ड्स ही माहितीचे कॉलम्स असतात आणि ही फील्डस माहितीचा विशिष्ट प्रकार साठवते. (fig मध्ये पहा) ऑथर टेबलमध्ये कन्ट्री हे फील्ड आहे.


व्हॅल्यू

टबलमधील विशिष्ट प्रकारच्या माहितीस व्हॅल्य म्हणतात. ओळ आणि फील्ड जेथे छेदतात त्याठिकाणी व्हल्यू असते. (आकती १.२b पाहा) ऑथर नेममध्ये Bartee Thomas C, ही व्हल्यू आहे.


मायक्रोसॉफ्ट अॅक्सेसवर दृष्टिक्षेप 

मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस ही मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केलेली, अनेकजण वापरु शकतील अशी डेटाबेस व्यवस्थापन पद्धती (DBMS) आहे. तिचा उपयोग डेटाबेसमध्ये डेटा घालणे, त्यात बदल करणे, तो मिळवणे आणि साठवणे यासाठी केला जातो. यामध्ये मोठ्या स्वरुपातील डेटा साठवला जातो आणि त्यात बदल करता येतो आणि पुन्हःपुन्हा करावी लागणारी कामे स्वयंचलित करता येतात. यामध्ये सुलभतेने वापरता येणारे फॉर्स आणि प्रक्रिया केलेला डेटा वापरुन अर्थपूर्ण अहवाल तयार करता येतात.


मायक्रोसॅाफ्ट ॲक्सेसची वैशिष्टये

        ॲक्सेस हे विंडोजवर आधारित अॅप्लिकेशन आहे आणि त्याचा इंटरफेस, विंडोज एनटीसारखा आहे. कोणत्याही विंडोज ॲप्लिकेशनमधील डेटा ॲक्सेसमध्ये किंवा अॅक्सेसमधून कट, कॉपी आणि पेस्ट करता येते.         एमएस ॲक्सेसची डेटा व्यवस्थापन क्षमता मोठी आहे. युजर यामध्ये फॉक्सप्रो, एक्सेल, ओरकल आणि इतर DBMS स्वरूपातील फाईल्स इंर्पोट किंवा एक्सर्पोर्ट करू शकतात.         अवघड कार्ये करण्यासाठी यामध्ये छोटे प्रोग्रॅम्स असतात जे फंक्शन म्हणून ओळखले जातात. या सर्वांबरोबरच एमएस ॲक्सेसमध्ये पासवर्ड सुविधा आहे. त्यामुळे केवळ अधिकृत युजर्स डटाबेस मिळवू शकतात.

        मायक्रोसॉफ्ट ऑफिस ॲक्सेस 2007 मध्ये टेम्प्लेट्सच्या स्वरुपात आधीच तयार केलेली ट्रॅकिंग‍ ॲप्लिकेशनस असतात ज्यामुळे त्यांचा उपयोग चटकन सुरुवात करण्यास करता येतो. यामध्ये नवीन व्हूज आणि लेकआअफटस, सुधारित सर्टिंग आणि फिल्टरींग, रिच टेक्सट, अनेक व्हॅल्यूजची फील्ड्स आणि विभागलेले फॉर्म्सही वापरता येतात. यामध्ये अधिक चांगली ट्रॅकिंग ॲप्लिकेशन्स आणि इतरांबरोबर ट्रॅक केलेल्या माहितीचे प्रभावीपणे आदानप्रदान करण्यासाठी अनेक नवीन वैशिष्टये आहेत.


डेटाबेसची रचना करणे

        डेटाबेस तयार करण्यापूर्वी, चांगली डेटाबेसची रचना करणे आवश्यक सते. रचनेचे नियोजन करणे आवश्यक असते तर अयोग्य रचनेमुळे नंतर या रचनेमध्ये बदल करावे लागतात. एका चांगल्या डेटाबेस रचनेमुळे डेटाची देखभाल करणे आणि साठवणे सोपे होते.

        नियोजन करण्यासाठी डेटाबेस कशासाठी तयार करायचा आहे हे आधी ठरवणे आवश्यक आहे. टेबल्सची संख्या आणि प्रत्येक टेबलमध्ये साठवायच्या माहितीचा प्रकार याचाही विचार करणे आवश्यक असते. प्रत्येक टेबलमध्ये कॉलम्स आणि टेबल्समधील रिलेशनशिप्स हे सुध्दा टेटाबेसची रचना करण्यासाठी महत्वाचे आहे.         डेटाबेस, अनेक टेबल्समध्ये विभागला जातो. उदा. : Library डेटाबेसमध्ये दोन टेबल्स असू शकतात. एक पुस्तकाचा तपशील साठवण्यासाठि आणि दुसरे पुस्तकांच्या लेखकांचा तपशील साठवण्यासाठी असू शकतो.


प्रायमरी की (Primary Key)

        टेबलमधील रेकॉर्डस ओळखण्यास प्रायमरी की मदत करते. जर एकाच नावाची दोन पुस्तके असतील आणि जर लेखकांची नावेही एकच असतील तर त्या पुस्तकांशी संबंध प्रस्थापित करणे अवघड असते.‍ उद. डिजिटल फंडामेंटल कम्पुर्टस नावाची दोन पुस्तके असून ती Bartee Thomas C आणि R. E. Swartwout अशा दोन लेखकांनी लिहिलेली आहेत. जसे एका वर्गातील विद्यार्थी रोल नंबरप्रमाणे आळखले जातात त्याचप्रमाणे प्रत्येक पुस्तकाच्या तपशील देता येतो. डेटाबेसमध्ये, या संदर्भ क्रमांकाला प्रायमरी की म्हणतात. या की फील्डमधील व्हॅल्यू प्रत्येक रेकार्डसाठी स्वतंत्र असते. प्रायमरी कीचा उपयोग टेबलमधील रेकॉर्ड्स स्वतंत्रपणे ओळखण्यासाठी करतात. उदा. लेखकाच्या टेबलमध्ये Auther ID ही प्रायमरी की आहे आणि बुक टेबलमधील Book ID ही प्रायमरी की आहे.

Swapnil Raut

This blog is related to Education purpose and in this blog "Education and Health" related post are there.

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने